पुणे- महापालिका निवडणूक लढवू पाहणाऱ्या अनेकांनी आता पर्यंत भरपूर खर्च केला . आता कालपासून आचारसंहिता लागली आणि धडाधड फ्लेक्स बाजी , रस्तो रस्ती होणारी जाहिरातबाजी थांबली . अर्थात उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतरच उमेदवाराच्या खर्चाची गणती सुरु होणार आहे . राजकीय पक्षांच्या अगर निवडणुका लढविणाऱ्या संघटनांच्या कार्यक्रमांच्या खर्चाची गणती आचारसंहिता लागू झाल्यापासून होईल . पण उमेदवारांचे मात्र तसे नाही.अर्ज दाखल केल्यानंतरच त्याच्या खर्चाची गणती होणार आहे , त्यामुळे आचारसंहिता असली तरी संक्रातीच्या सणावर काही परिणाम होईल असे वाटत नसले तरी वस्तू वाटप करणाऱ्यांना वस्तू वाटप करताना याला मत द्या .. पक्षाचे चिन्ह ,नाव टाका … असे प्रकार मात्र करता येणार नाहीत . आणि राजकीय व्यासपीठावरून कार्यक्रम करता येणार नाहीत .असे स्पष्ट झाले आहे .