मुंबई – पीए गजानन पाटील लाचप्रकरणी एसीबीने माजी मंत्री एकनाथ खडसेंना क्लीन चीट दिली आहे. एसीबीने याप्रकरणी दाखल केलेल्या आरोपपत्रात एकनाथ खडसेंचे नावही नाही. मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष एसीबी न्यायालयात हे आरोपपत्र दाखल केले आहे.त्यामुळे एकनाथ खडसेंचा या प्रकरणातून निर्दोष सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
एसीबीने एका हजारांहून अधिक पाने असलेले आरोपपत्र कोर्टात सादर केले. त्यात केवळ खडसेंचा पीए गजानन पाटील यालाच आरोपी करण्यात आले आहे. गजानन पाटील याला एसीबीने मंत्रालयातील खडसेंच्या दालनातून ताब्यात घेतले होते. विशेष म्हणजे आरोपपत्रात गजानन पाटील याला ताब्यात घेतलेल्या ठिकाणाचाही उल्लेख नाही.
एसीबीने दिली एकनाथ खडसेंना क्लीन चीट
Date:

