‘ईडी’ ने केला अजित पवारांच्या नातेवाईकांचा साखर कारखाना जप्त

Date:

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती

मुंबई-महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणात ईडीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांचा साखर कारखाना जप्त केला आहे. अजित पवारांचे मामा राजेंद्र कुमार घाडगे यांच्या साताऱ्यातील जरंडेश्वर कारखान्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली. जरंडेश्वर साखर कारखाना पूर्वी सहकारी कारखाना होता. मात्र, महाराष्ट्र सहकारी बँकेचं कर्ज फेडू न शकल्याने त्या कारखान्याचा लिलाव करण्यात आला. नंतर तो कारखाना खाजगीरित्या विकत घेतला गेला आला. अजित पवारांचे निकटवर्तीय हा कारखाना चालवत होते.

https://twitter.com/dir_ed/status/1410587674327412736

साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यांच्या मालकांनी महाराष्ट्र सहकारी बँकेकडून कर्ज घेऊन ते नंतर बुडवलं. नंतर त्या साखर कारखान्याचा लिलाव करण्यात आला. या साखर कारखान्याची कमी भावात विक्री झाली आहे. याबाबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. त्यानुसार मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याच्या अनुषंगाने ईडीने आपला गुन्हा दाखल केला आहे. त्याअनुषंगाने ईडीने केलेली ही मोठी कारवाई आहे.

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने सहकारी बँकेतील हजारो कोटी रुपयांच्या घोटाळ्याबाबत अजित पवार आणि ६५ जणांना क्लीन चिट दिली होती. मुंबईच्या सत्र न्यायालयात मागील वर्षी क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला होता. मात्र या निकालाला माजी मंत्र्यांसह पाच जणांनी आव्हान दिलं होतं. सुरेंद्र मोहन अरोरा, माजी मंत्री शालिनीताई पाटील, माजी आमदार माणिकराव जाधव यांच्यासह आणखी दोघांनी प्रोटेस्ट याचिका दाखल केली होती.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकांचा बिगूल वाजलेलं असताना महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, दिलीपराव देशमुख, ईश्वरलाल जैन, जयंत पाटील, शिवाजीराव नलावडे, शिवसेनेचे आनंदराव अडसूळ, राजेंद्र शिंगणे आणि मदन पाटील यांच्यासह महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे चेअरमनसह ७० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.

त्यानंतर ऑक्टोबर २०१९मध्ये अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी पवारांचा राजीनामा मंजूर देखील केला होता. विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची सुरूवात झाली असतानाच पवार यांनी राजीनामा दिल्याने राजकीय चर्चेला उधाण आलं होतं. ते दोन दिवस ‘नॉट रिचेबल’ही होते. मात्र नंतर, शरद पवारांवर नाहक आरोप झाल्यानं व्यथित होऊन आपण राजीनामा दिला होता, असं सांगत त्यांनी नेते आणि कार्यकर्त्यांची माफी मागितली होती.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

लाडक्या बहिणींनो बँक खाते चेक करा!:जानेवारीचा हप्ता जमा होण्यास सुरुवात

मुंबई-मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात जानेवारी...