राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल यांच्या मुंबईतल्या सीजे हाऊसमधील घरावर ईडीची टाच

Date:

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. प्रफुल्ल पटेलांचं मुंबईतील सीजे हाऊसमधील (CJ House) घरही ईडीकडून जप्त करण्यात आलं आहे. इक्बाल मिरची प्रकरणी ईडीने प्रफुल्ल पटेलांवर ही कारवाई केली आहे. यासंबंधीत प्रफुल्ल पटेलांची चौकशीही झाली होती. मुंबईतील सीजे हाऊसमधील चौथ्या मजल्यावरील प्रफुल्ल पटेलांच्या घरावर ईडीने टाच आणली आहे.प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे ते अतिशय निकटवर्तीय आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शरद पवार यांच्यानंतर त्यांना च अतिशय महत्त्व असते. सध्या ते राष्ट्रवादीचे राज्यसभेवर खासदार आहेत. युपीएचे सरकार सत्तेत होते तेव्हा पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या कार्यकाळात ते विमानऊड्डाण मंत्री होते.वरळी मधील सीजे हाऊसमधील प्रफुल्ल पटेलांचे घर जप्त करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच हे प्रकरण समोर आले होते, त्यापार्श्वभूमीवर ईडीने ही कारवाई केली आहे. प्रफुल्ल पटेल हे सध्या मुंबईतच असून, काही वेळापूर्वी ते वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये दिसले होते.अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय इकबाल मिर्चीने बेकायदा पद्धतीने वरळीमधील तीन मालमत्तांच्या विक्रीचा व्यवहार केला आणि त्यात काळा पैशांचा व्यवहार करण्यात अनेकांनी त्याला मदत केल्याचा आरोप आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शहराचं बदलणार रूप … शहर परिवर्तन कक्षाची बैठक संपन्न.

पुणे- वाढता शहरच्या वाढत्या समस्यांना फक्त तोंड द्यायचे नाही...

कर्नाटक पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन मंत्रालयाने पुण्यात देशांतर्गत पर्यटन बी 2 बी रोड शोचे आयोजन

पुणे, 5 फेब्रुवारी 2026 केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने, त्यांचे प्रादेशिक...