थकित कर असलेल्या जेसीबी,बस, ट्रक इत्यादी वाहनांचा ई-लिलाव

Date:

पुणे, दि. 14 :- मोटार वाहन कर न भरलेल्या व मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्हयाअंतर्गत जप्त केलेल्या 30 वाहनांचा जाहीर ई-लिलाव उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी चिंचवड येथे 24 जून 2021 रोजी सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ठेवण्यात आला असल्याची माहिती पिंपरी चिंचवडचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी दिली आहे.
ही वाहने उप प्रादेशिक परिवहन कार्यालय,मोशी प्राधिकरण पिंपरी चिंचवड येथील आवारात 14 जून ते 22 जून या दरम्यान कार्यालयीन वेळेत पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. एकूण 30 वाहने असून यात बस, ट्रक, डी व्हॅन, पिकअप व्हॅन, टुरिस्ट टॅक्सी, जेसीबी इत्यादी वाहनांचा समावेश आहे. ई लिलावाच्या तारखेपर्यंत वाहन कर भरण्याची वाहन मालकांना संधी राहील.
ई-लिलाव होणा-या वाहनांची यादी जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे, तहसिलदार पुणे शहर व हवेली, जुन्नर, मावळ, मुळशी, खेड, आंबेगाव व उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी चिंचवड यांचे सूचना फलकांवर जनतेच्या माहितीसाठी लावण्यात आली आहे.
14 जून ते 20 जून कालावधीत www.eauction.gov.in या संकेत स्थळावर नाव नोंदणी करण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध आहे. ऑनलाईन नाव नोंदणी झाल्यानंतर वरील कालावधीत उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी चिंचवड येथे खटला विभागात सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्रत्येक वाहनासाठी रु. 50 हजार रकमेचा “DY RTO PIMPRI CHINCHWAD” या नावे अनामत रकमेचा डीमांड ड्राफ्टसह ऑनलाईन सादर केलेल्या कागदपत्रांच्या प्रती, नाव नोंदणी करणे व कागदपत्रे पडताळणी, मान्य करुन घेण्यासाठी सादर करणे गरजेचे आहे.
लिलावाच्या अटी व नियम उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी चिंचवड येथील नोटीस बोर्डावर कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत उपलब्ध राहील. ही वाहने ‘ जशी आहेत तशी’ या तत्त्वावर ई- लिलावाद्वारे विकली जातील. कोणतेही कारण न देता हा लिलाव रद्द करण्याचे अथवा तहकूब ठेवण्याचे अधिकार उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी चिंचवड यांनी स्वत:कडे राखून ठेवले आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सहा महिन्यांत रेल्वे तिकिटांच्या दरात दुसऱ्यांदा वाढ

आजपासून तुमचा रेल्वे प्रवास महाग झाला आहे. गेल्या सहा...

शरद पवार एनडीएमध्ये येऊ शकतात:मंत्री संजय शिरसाटांचे मोठे विधान

आज किंवा उद्या युतीची घोषणा होईल छत्रपती संभाजीनगर-महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर...

पीएमआरडीए मुख्यालयात ‘वीर बाल दिन’; साहिबजाद्यांच्या सर्वोच्च बलिदानाला अभिवादन

पुणे : धर्म, स्वाभिमान आणि राष्ट्रनिष्ठेसाठी अल्पवयातच सर्वोच्च बलिदान...

महापालिकांसाठी राष्ट्रवादीचे ४० स्टार प्रचारक मैदानात

मुंबई दि. २५ डिसेंबर - राज्यातील २९ महानगरपालिका सार्वत्रिक...