दुर्गा आणि नवचैतन्य (लेखिका:पूर्णिमा नार्वेकर)

Date:

‘रॉयल ऑपेरा हाऊस आता इथून १० मिनिटांवरच आहे’, गूगल मॅप पाहत पाहत ओंकार म्हणाला. खाकी टूर्सच्या Durga’s of Mumbai साठी आम्हाला रॉयल ऑपेरा हाऊस जवळ जमायचे होते. मुंबईत इतक्या वेळा फिरताना हे ठिकाण बघितले होते पण काही क्लू मिळेना. तिकडे पोहोचताक्षणी लक्षात आले…अरे हेच का ते! इतक्या वेळा जवळून गेलोय की…

आमची टूर्सची होस्ट प्रीती केळकर अजून आलेली नव्हती. मग काय रॉयल ऑपेरा हाऊसचे निरीक्षण सुरू झाले. ‘खाकी’चा AOMचा कोर्स केल्यापासून सगळीकडे बारकाईने, अभ्यासपूर्ण नजरेने बघायची सवय वाढली आहे. रॉयल ऑपेरा हाऊसचे निरीक्षण चालू असताना प्रीती आली. इतके दिवस ऑनलाईनच सगळे एकमेकांना भेटत होतो. आता प्रत्यक्ष आमनेसामने भेट झाल्यावर मात्र खूप आनंद झाला. आमची हजेरी घेऊन झाली होती पण अजून काही लोक येणार होते, त्यामुळे थोडं थांबावं लागलं. वेळेप्रमाणे प्रीतीने माहिती सांगायला सुरुवात केली. आधी खाकी टूर्सची माहिती आणि उद्देश याबद्दल सांगून रॉयल ऑपेरा हाऊसचा संदर्भ देत ती थेट मनोरंजनाच्या दुनियेतच आम्हाला घेऊन गेली. शशी कपूर व त्यांची पत्नी जेनिफर यांच्याविषयी सांगताना ‘पृथ्वी थिएटर’चा जन्म आणि त्याचे कार्य याची महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. (जेनिफर कपूरने एकहाती घर, मुलं, संसार सांभाळून ‘पृथ्वी’साठी अविरत काम केले.) त्यांनतर प्रीतीने पुढे एका महिला समाज मंडळाची ओळख करून दिली, ते म्हणजे अवंतीकाबाई गोखले यांनी सुरू केलेले ‘हिंद महिला समाज’…त्यांच्याकडच्या दिवाळी फराळाला आजही मागणी आहे. ‘देवधर म्युझिक स्कूल’च्या स्थापनेसाठी ज्यांनी पाठिंबा दिला त्या सरोजिनी नायडू. अंतराळात ज्यांचा आवाज पोहोचला आहे त्या केसरबाई केरकर. बाल रंगभूमीच्या सुधा करमरकर. चित्रकार हळदणकरांची वास्तू. आपली स्वतःची वेगळेपणाची ओळख सांगणारी डॉ. रखमाबाई राऊत आणि त्यांची वास्तू…प्रीती अगदी ओघवत्या भाषेत प्रत्येक दुर्गेची आणि तिच्या कार्याची ओळख करून देत होती. दुर्गाबाई खोटे, रमाबाई रानडे, पंडिता रमाबाई, डॉ. काशीबाई नवरंगे, क्रांतीकारी अरुणा असफअली, उषा मेहता… इथवर येऊन दुर्गांची सफर कधी पूर्ण झाली ते कळलेच नाही… दसऱ्याच्या दिवशी या दुर्गांची माहिती ऐकून भारावून गेलो आम्ही सगळे. स्वातंत्र्यपूर्व काळात या दुर्गांनी त्यांच्या ध्येयपूर्ततेसाठी केलेले अथक प्रयत्न ऐकून एक वेगळीच ऊर्जा मिळते. त्या त्या ठिकाणी त्या वास्तूच्या अवतीभवती एक प्रकारची प्रचंड पॉझिटिव्ह एनर्जी आजही आहे असे जाणवले. हल्लीच्या या स्पर्धेच्या युगात आपले टार्गेट पूर्ण करण्यासाठी आताच्या दुर्गांनाही अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते आहे. काही यशस्वी होतात तर काही नैराश्याने ग्रासतात. त्यांनी या दुर्गांची सफर तर आवर्जून करावी आणि पुन्हा सगळी मरगळ झटकून जोशाने आपापल्या ध्येयपूर्तीकडे वाटचाल करावी. या टूरची होस्ट प्रीती.. तिच्यात या दुर्गांचे बळ आले होते. उन्हात न थकता, मास्क घालून प्रवास करत बोलणे खरं तर अवघड आहे. पण हे सर्व प्रीतीने लीलया पार पाडले.खरेतर त्या दिवसापुरती ही दुर्गांची सफर पूर्ण झाली पण मनोमन वाटू लागले की प्रत्येकीने या मुंबईतील ज्ञात, अज्ञात दुर्गांना या सफरीतून भेटावे, जाणून घ्यावे आणि आपल्यातील सुप्त दुर्गेला आणि तिच्या ध्येयाला जागृत करावे.

– पूर्णिमा नार्वेकर, दहिसर

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘आणीबाणीचे नायक आणि खलनायक’ या पुस्तकाचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते प्रकाशन

‘आणीबाणी’ चांगली की वाईट, या वादापेक्षा त्याकडे निरपेक्ष इतिहास...

“एच.डी.मांजरेकर उत्कृष्ट एन.सी.सी कॅडेट ट्रॉफी” वितरण कार्यक्रम संपन्न

मेजर एच.डी. मांजरेकरउत्कृष्ट एन.सी.सी.कॅडेट ट्रॉफी वितरणरक्तदान शिबिराचे आयोजन६१ रक्तदात्यांनी...

देशभक्तीपूर्ण वातावरणात ६४ वा गोवा मुक्ती दिन साजरा; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून राष्ट्रध्वजारोहण

‘ऑपरेशन विजय’, पिंटो व कुंकळ्ळी उठावांचा मुख्यमंत्र्यांकडून उल्लेख; पोलीस,...