पुणे- डीएसके ग्रुप च्या नीरज लाईफ लाईन फौन्डेशन च्या स्थापनेची घोषणा येत्या २८ तारखेला डीएसके यांच्या वाढदिवशी समारंभपूर्वक केली जाणार असून सहकार मंत्री चंद्रकांत पाटील ,परिवहन मंत्री दिवाकर रावते , बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे जलसंपदा मंत्री विजय शिवतारे तसेच पुणे महानगर विकास प्राधिकरणाचे मुख्य अधिकारी महेश झगडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत .
नीरज लाईफ लाईन फौन्डेशन अध्यक्ष डॉ .शरद हर्डीकर , विश्वस्त विवेक वेलणकर , आणि dsk डेव्हलपर्स चे सीईओ धनंजय पाचपोर यांनी आज पत्रकार परिषद घेवून
फौन्डेशनचे काय काम करेल हे सांगून या कार्यक्रमाबाबत माहिती दिली . रस्त्यांची लांबी -रुंदी झाडांची रचना ,दुभाजकांचे आणि कठड्याचे बांधकाम याबाबत सरकारला प्रबंध सादर करणे . तसेच मानवी चुकांवर प्रबोधन करणे अशा स्वरूपाचे काम आपण करणार असल्याचे यावेळी धनंजय पाचपोर यांनी सांगितले .
अस्थिरोगतज्ञ डॉ .शरद हर्डीकर हे यावेळी काय म्हणाले ते पहा -ऐका …
एक्स्प्रेस वे वरील अपघात -रस्ते बांधकामातील त्रुटींचा प्रबंध सादर करणार —
Date:

