पुणे- सदोष रस्ते बांधणीमुळे चूक नसताना माणसे किडा मुंगीप्रमाणे मारत आहेत . महाराष्ट्रातील या मृत्युच्या एक्स्प्रेस वे विरोधात चला लढा उभारू या… असे आव्हान फेसबुक वरून प्रख्यात बांधकाम व्यावसायिक डीएसके यांनी केले आहे
गेल्या बुधवारी त्यांना मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर झालेला अपघात … अनेकांना हादरा देवून गेला तसा आपल्या चालकाच्या मृत्यूने डीएसके देखील अत्यंत भावनिक बनले. आणि त्याची चूक नसताना त्याला आलेला मृत्यू त्यांना सोसवेनासा झाला. जखमी अवस्थेत लोकांनी त्यांना दिलेली प्रेमाची हाक आणि चालक निरंजन याचा हकनाक गेलेला बळी.. यामुळे आता अशा मार्गावर चूक नसताना किती हकनाक बळी जात असतील किती कुटुंबे उध्वस्त होत असतील या अस्वस्थ करणाऱ्या जाणीवेने .. त्यांनी सदोष रस्ते बांधणीच्या विरोधात लढा उभारण्याची हाक आपल्या चाहत्यांना दिली आहे. पहा आणि ऐका डीएसके यांनी शेअर केलेला व्हिडीओ….
मृत्यूच्या एक्स्प्रेस वे … विरोधात आता लढा सुरु .. डीएसके
Date:

