पुणे – ‘मी न्यायालयात पट्टेवाला असताना आणि पोलीस अधिकारी असताना ज्या अधिकारी लोकांना मी सॅल्युट करत होतो, त्या लोकांनी मी मंत्री झाल्यावर मला सॅल्युट केल्यानंतर मी कधीच त्यांच्याकडे सत्तेच्या किंवा पदाच्या अविर्भावातून पाहिले नाही. कोणतीही सत्ता व पद येते आणि जाते. त्यामुळे मी माझ्या डोक्यात कधीच सत्तेची हवा जाऊ दिली नाही’, असे मत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी केले.
डी. एस. कुलकर्णी फाऊंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या डीएसके गप्पांच्या १८ व्या पर्वाची सांगता रविवारी सुशिलकुमार शिंदे यांच्या मुलाखतीने झाली. या मुलाखतीमध्ये शिंदे बोलत होते. .यावेळी शिंदे म्हणाले, मी सोलापूरला न्यायालयात असताना ज्या न्यायाधिशांना मी सॅल्युट कारायचो त्यांच्या हाताखाली शिपायाचे काम करत, ते न्यायाधिश मी मंत्री झाल्यानंतर माझे स्वागत करण्यासाठी आले होते. हा आपल्या भारतीय लोकशाहीचा आणि भारतीय संविधानाचा विजय आहे. लोकशाहीत काही ही होऊ शकते. पदे येतील आणि जातील. आपण सत्ता आपल्या डोक्यात जाऊ देता कामा नये. आयुष्यात आलेल्या अपयशांना मी कधीही घाबरलो नाही. ज्या सोलापूरच्या जनतेने मला सलग आठ वेळा निवडून दिले, त्या जनतेने एक वेळ निवडणूकीत पाडले म्हणून मी त्यांच्यावर रागाला गेलेलो नाही किंवा त्यांच्यावर नाराजही नाही. त्यांनी प्रत्येक वेळी मलाच का निवडून द्यावे, असे माझे मत आहे.
निवेदक आणि मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी त्यांची मुलाखत घेतली