पुणे :
विश्रांतवाडी येथील ड्रीम्स रेसिडेन्सी सहकारी गृहरचना संस्थेच्या अध्यक्षपदी अहमद अब्बास शेख, सचिवपदी आबाजी भोसले, खजिनदारपदी राजू अनंत यांची निवड झाली. ही निवड सहकार खात्याकडून झालेल्या निवडणुकीतून करण्यात आली.
तसेच नवनिर्वाचित संचालक बैठकीमध्ये
सोसायटीच्या उपाध्यक्षपदी नीमा शहा यांची निवड झाली. सौ.सोनिया मोरे (उपनिबंधक सहकारी संस्था) यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.
सदर निवडणुकीत बंडू पवार, नागू यादव, गिल्बर्ट डिसोझा, पॉल सॅम्युअल, रेचेल योहानान यांची
सोसायटीच्या सभासदपदी नियुक्ती झाली आहे.