पुणे-
दिवा पेजीएण्ट्सचे संस्थापक कार्ल व अंजना मस्करेन्हास यांचा अभिनव विचार – मिसेस महाराष्ट्र २०२२ ने १६ ऑक्टोबर २०२२ रोजी प्रतिष्ठित हयात रिजेन्सी पुणे येथे त्याच्या भव्य ६व्या सीझनचा समारोप केला. राज्यातील प्रिमिअर पेजीएण्टला प्रमाणित करत यंदा सिल्व्हर, गोल्ड व एलाइट या तीन श्रेणींमधील प्रतिष्ठित क्राऊनसाठी जवळपास ६० फायनालिस्ट्सनी सहभाग घेतला. यावेळी बॉलिवुड सितारे आणि शहरातील प्रख्यात मान्यवर व्यक्ती उपस्थित होत्या.
पुणे शहराचे पोलिस आयुक्त श्री. अमिताभ गुप यांनी त्यांची पत्नी जुगनू यांच्यासह प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती दाखवून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
माजी मिस इंडिया मोहक संगीता बिजलानी या प्रख्यात ज्युरीमध्ये सामील होत्या. तसेच ज्युरीमध्ये रोसरी फाऊंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक विनय अरन्हा, फूड क्रिटीक विद्या तिवारी, द पॅरिस सलून्सच्या मालक प्रियदर्शिनी साहू, सेलिब्रिटी अॅस्ट्रोलॉजर व न्यूमरोलॉजिस्ट श्वेता जुमानी, मिसेस इंडिया एम्प्रेस ऑफ द नेशन २०२१ डॉ. लीना गुप्ता, मिसेस महाराष्ट्र २०२१ (सिल्व्हर) सिसिलिया सन्याल, मिसेस महाराष्ट्र २०२१ (गोल्ड) कॅरेन टेरी रेझा आणि दिवाचे संचालक कार्ल मस्करेन्हास यांचा देखील समावेश होता.
फायनालिस्ट्सनी उत्कृष्ट कामगिरी केली आणि आत्मविश्वास व उत्कृष्ट कामगिरीसह स्वतःला सादर केले. अभिनेत्री शीबा यांनी प्रत्येक फायनालिस्टला सब-टायटलसह व क्राऊनसह सन्मानित केले.
हॉटे २४ ने दिवा गर्ल्सचा समावेश असलेल्या डान्स सीक्वेन्सच्या माध्यमातून जगभरातील त्यांचे विशेष, आकर्षक डिझाइनर बॅग्ज व अॅक्सेसरीज दाखवले.
कॉमर्सियो व्हायब्रण्ट एलएलपीने फॉरेक्स अॅण्ड ट्रेडिंगच्या माध्यमातून महिलांना त्यांची कमाई वाढवण्यास सक्षम केले.
डॉ. लीना गुप्ता व तृप्ता दास यांना अनुक्रमे मिसेस युनिव्हर्स वेस्ट एशिया आणि मिसेस युनिव्हर्स ऑस्ट्रेलिया म्हणून क्राऊन देत सन्मानित करण्यात आले. या वर्षाच्या अखेरीस सोल, कोरिया येथे आयोजित “मिसेस युनिव्हर्स २०२२”मध्ये त्या भारताचे प्रतिनिधीत्व करतील.
विजेत्या (सिल्व्हर):
– डॉ. सोनल मिरचंदानी: विजेती
– तृप्ता दास: प्रथम उपविजेती
– प्रतिक्षा खरे: द्वितीय उपविजेती
– स्पेंता पटेल: पीपल्स चॉईस
विजेत्या (गोल्ड):
– आरती महाजन: विजेती
– शिल्पा मनवानी: प्रथम उपविजेती
– झारना संघवी: द्वितीय उपविजेती
विजेत्या (एलाईट):
– शर्मिला तिवारी: विजेती
– नीना सिंग: प्रथम उपविजेती
या मेगा शोचे दिग्दर्शन प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक पूजा सिंग यांनी केले आहे.
सिसिलिया सन्याल, मृणालिनी तायडे, तनुजा बंगेरा आणि अंजनी कुशवाह यांनी या शानदार कार्यक्रमाचे कुशलतेने आयोजन केले.
या स्मरणीय पेजीएण्टचा उद्देश फायनालिस्ट्सना त्यांच्या अंतर्बाह्य वाढीसाठी प्रोत्साहित करणे हा होता. दिवा पेजीएण्टने पुन्हा एकदा बाजी मारली आणि _Dare*Dream*Dazzle_ साठी उपस्थित असलेल्या प्रत्येक निमंत्रित व्यक्तीला प्रेरणा देण्यासाठी पेजीएन्ट्रीला नव्या उंचीवर नेले.

