‘RULES DON’t APPLY’या ब्रीदवाक्यातून आपली जीवनी घडवणाऱ्या डॉ. रखमाबाई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सावांत स्थान मिळवण्यात यशस्वी होत आहेत. मानाचा समजला जाणाऱ्या ‘DFW दक्षिण आशियायी चित्रपट महोत्सवा’त हा चित्रपट दाखवला जाणार आहे. हा चित्रपट सोशल मिडियाच्या
माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने ‘डॉक्टर रखमाबाई’ चित्रपटाचा टीझर DFW दक्षिण आशियायी चित्रपट महोत्सवाच्या सोशल मिडीयावरून लाँच करण्यात आला. या टीझरमध्ये अठराशेच्या दशकात स्त्रियांना सोसावे लागणारे अत्याचार, त्यांना वेठीला धरणारी मागासलेली विचारसरणी, डॉ.रखमाबाईंना त्यांच्या बाबांची लाभलेली साथ आणि डॉ. रखमाबाईंची डॉक्टर होण्याची जिद्द आपल्याला दिसते.
डॉक्टर रखमाबाईंच्या जिद्दीला सलाम करत DFW दक्षिण आशियायी चित्रपट महोत्सवाची सांगता डॉक्टर रखमाबाई या चित्रपटाने होणार आहे. चित्रपटानंतर डॉक्टर रखमाबाईंची भूमिका चोख बजावणाऱ्या तनिष्ठा चॅटर्जींशी उपस्थितांना संवादही साधता येणार आहे. डॉक्टर रखमाबाई साकारणं आव्हानात्मक असल्याचं म्हणत ही भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याचा आनंद तनिष्ठाने व्यक्त केला.
दिग्दर्शक अनंत महादेवन दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती डॉ. स्वप्ना पाटकर यांनी केली आहे. समाजाविरोधात आपलं स्वत्व जपणाऱ्या डॉक्टर रखमाबाईंची जिद्द आपल्यासमोर आणणारा ‘डॉक्टर रखमाबाई’ लवकरच आपल्या भेटीला येणार आहे.