ऊसतोडणी कामगारांना सुविधा उपलब्ध करून द्याव्यात- डॉ नीलम गोऱ्हे

Date:

मुंबई, दि. ७ : ऊसतोड कामगार महिलांच्या अवैधरित्या गर्भाशय काढण्याच्या संपूर्ण राज्यातील घटनांबाबत संशोधनपर अहवाल तयार करावा. यामध्ये अशासकीय रुग्णालयात किती गर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रिया केल्या गेल्या याबाबत माहिती गोळा करावी जेणे करून त्याबाबत दक्षता घेता येतील.
ऊसतोडणीसाठी स्थलांतर करणाऱ्या कामगारांच्या कुटुंबाला ऊसतोडी ठिकाणी आवश्यक आरोग्य,स्वच्छता आणि मुलांसाठी शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात
अशा सूचना महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज येथे दिल्या.

बीड जिल्ह्यातील ऊसतोडणी कामगार महिलांच्या गर्भाशय काढून टाकण्याच्या घटनां बाबत २०१९ मध्ये विधिमंडळाने डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने २४ ऑगस्ट २०१९ रोजी तत्कालीन आरोग्य मंत्री यांना सविस्तर अहवाल सादर केला आहे. यामध्ये केलेल्या सूचनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या.

विधीमंडळात झालेल्या या बैठकीस सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा डॉ. तानाजी सावंत दूरदृष्यप्रणालीव्दारे उपस्थित होते. विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, महिला व बालविकास आयुक्त आर. विमला, कामगार आयुक्त सुरेश जाधव, सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक डॉ. नितीन अंबाडेकर उपस्थित होते.

डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले की, ऊसतोडणी कामगारांची संख्या जास्त असलेल्या जिल्ह्यातील तसेच इतर जिल्ह्यांतही गर्भाशय काढण्याच्या घटनांत वाढ झाली आहे का? झाली असेल तर कोणत्या जिल्ह्यात जास्त प्रमाण आहे याबाबत संशोधनपर अहवाल तयार करण्यात यावा. त्यासाठी सर्व्हेक्षण आणि संशोधन करावे.ऊसतोडणी कामगारांची तोडणी हंगामापुर्वी आणि हंगाम पूर्ण झाल्यावर वैद्यकीय तपासणी करण्यात यावी. ही तपासणी शासनाच्या आरोग्य केंद्रात करावी. ऊसतोडणी कामगारांच्या जाण्या येण्याच्या मार्गाचे तपशील घेवून त्यांना या मार्गावर आवश्यक त्या पायाभूत सुविधा पुरविण्यात याव्यात, अशा सूचना त्यांनी दिल्या.

ऊसतोडणी कामगारांना आरोग्य, निवास आणि मुलांसाठी शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी प्रमुख नियोक्ता यांच्याशी करावयाच्या कराराचा एक प्रारुप निश्चित करण्यात यावा. या करारात महिला व लहान मुले आणि मुली यांना आवश्यक सुविधा देणेबाबतचे प्रयोजन या करारा मध्ये असावे. कराराचे प्रारुप तयार करताना सार्वजनिक आरोग्य, महिला व बालविकास, कामगार आणि ऊस तोडणी कामगार महामंडळ यांच्याकडून सूचना घेतल्या जाव्यात, अशाही सूचना त्यांनी दिल्या.

यावेळी ऊसतोडणी कामगारांच्या आरोग्य विषयक प्रश्नांबाबत पुढील आठवड्यात आरोग्य विभागाच्या सर्व संबंधितांची बैठक घेण्यात येईल, असे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा डॉ तानाजी सावंत यांनी सांगितले. तसेच सर्व ऊसतोड कामगारांची संपूर्ण आरोग्य तपासणी करावी व त्यांना आरोग्य ओळखपत्र ही देणेबाबत पुढील आठवड्यातील बैठकीत ठरविण्यात येईल असे डॉ तानाजी सावंत यांनी सांगितले.
डॉ गोऱ्हे यांनी महिला व बालकल्याण आयुक्त यांनी लहान मुलांना शिक्षण,संस्कार व त्यांचे मॅपिंग करून आरोग्य सुविधा ही उपलब्ध करुन द्याव्यात असे निर्देश दिले.
ऊसतोड कामगार मंडळाने ऊसतोड महिला कामगार यांना विमा,आरोग्य,शिक्षण व प्राथमिक सुविधा बाबत योजना आखाव्यात व या मंडळाचे आर्थिक नियोजन योग्य प्रकारे करावे असे सूचित केले.

बैठकीत प्रादेशिक साखर सहसंचालक शरद झरे, लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोडणी कामगार महामंडळाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब सोळंकी यांनी ऊसतोडणी कामगारांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध प्रकारच्या योजनांची माहिती दिली..

बैठकीस सहसचिव व्हि. एल. लहाने,सहकार विभागाचे उपसचिव अं. पां. शिंगाडे, प्रादेशिक साखर सहसंचालक शरद जरे, कामगार उपायुक्त सुनीता म्हैसकर, चंद्रकांत राऊत, औद्योगिक सुरक्षा संचालक मु. र. पाटील आदी उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मुंबईत राष्ट्रवादी शरद पवार गटाचा महायुतीला पाठिंबा, 11 फेब्रुवारीला नव्या महापौरांची निवडणूक

मुंबई- महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे....

शहराचं बदलणार रूप … शहर परिवर्तन कक्षाची बैठक संपन्न.

पुणे- वाढता शहरच्या वाढत्या समस्यांना फक्त तोंड द्यायचे नाही...

कर्नाटक पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन मंत्रालयाने पुण्यात देशांतर्गत पर्यटन बी 2 बी रोड शोचे आयोजन

पुणे, 5 फेब्रुवारी 2026 केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने, त्यांचे प्रादेशिक...