Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

डॉ. मरल यज़ारलू आणि पंकज त्रिवेदी दुचाकीवर पार करणार ७ खंड

Date:

“राईड टू बी वन”  द्वारे ५० पेक्षा जास्त देशांना  देनार भेट 
पुणे- आज बहुसंख्य लोक दैनंदीन जीवनात रोज बाईक चालवतात, बाईक हा जीवनाचा एक अविभाज्य भाग बनली आहे, परंतु आंतरराष्ट्रीय चौकार ओलांडून खुप सारे देश बाईकच्या माध्यमातुन फिरने ही  कल्पनाच दमछाक करणारी आहे. परंतु  बाईकर्सना ही जीवनातील खुप मोठी संधी वाटते. असेच बाईकवेडे डॉ. मरल यजारलू आणि पंकज त्रिवेदी हे “राईड टू बी वन” ह्या मोहीमे अंतर्गत  आपल्या प्रवासाची सुरवात 15 मार्च रोजी करणार आहे. ज्यामध्ये हे राईडर्स  दिड वर्षामध्ये दुचाकीवरती ५० पेक्षा जास्त देशांना भेट देतील. डॉ, मरल यज़ारलू आणि पंकज त्रिवेदी यांचा हा दुचाकीवर सात खंडाना गवसनी घालण्याचा प्रयत्न खुप साहसी आहे. ह्या अभियानासाठी पंचशील  रियल्टी  प्रायोजक आसतील.
इराणमध्ये जन्मलेली डॉ.मरल भारताला आपले घर समजते. मरल लहाणपणापासूनच शैक्षणिक, क्रिडा, काला अश्या विविध क्षेत्रांमध्ये पारंगत आहे. मार्केटींग मध्ये पीएचडी  केलेल्या मरलची कॉर्पोरेट कारकीर्द देखील खुप यशस्वी आहे. भारतातील अग्रगण्य पंचशील रियल्टी डेवलपर मध्ये ती मार्केटींग प्रमुख आहे. याचबरोबर तीने भारत आणि इराण मध्ये आपले ५ सिरेमिक, कैनवास ५ पेंटींग प्रदर्शन केले होते.प्रवास आणि दुचाकीची आवड आसणार्या मरल ने अत्तापर्यंत जवळ-जवळ ६७ देशांना भेट दिली आहे. इटली ते आल्प्सचा बाईक प्रवास  तीने एकटीने पार केला. तीला क्विन अॉफ सुपरबाईक म्हणता येऊ शकते. भारतामध्ये तीला लेडी रायडर्सचा पहील महिला सूपरबाईक क्लब भेटला. ड्युकाटी आणि बीएमडब्ल्यू  असलेली ती पहीली भारतीय महिला आहे.
 आता मरल आपल्या जीवनातील एक मोठा साहसी एडवेंचर करनार आहे.” राईड टू बी वन” ज्यात तीचा राईडर मित्र  पंकज त्रिवेदी  देखील तीच्याबरोबर असेल. पंकज मैदानी उद्योग आणि  आऊटडोअर्स लर्नींग कॉर्पोरेट प्रशिक्षण कंपनीत कार्यरत आहे, जी भारतबरोबरच जागतीक स्तरावरती देखील  कार्यरत आहे . उत्साही फोटोग्राफर आणि दुचाकीप्रिय म्हणुन पंकजची ओळख करता येऊ शकते.समुद्रसपाटीपासुन 5713 उंचीवरती दुचाकी चालवण्याचा विक्रम पंकज च्या नावावर आहे. त्याने २००७ मध्ये कन्याकुमारी ते लेह हा प्रवास ५ दिवस, ५ तास आणि ४५ मिनटात करत लिम्का बुक अॉफ रेकॉर्ड तोडले. पंकजला आपला जीवन प्रवास आनंददायी वाटतो,  आत तो नवीन आव्हने पेलण्यास सज्ज झाला आहे.मरल बरोबर दुचाकीवर ७ खंडाचा प्रवास करने हे त्याचे स्वप्न आहे. मरल  आणि पंकजने आपआपल्या जीवनात मोठे व्यावसायिक यश मिळवले आहे  परंतु त्यांच्या मते दुचाकी चालवण्या सारखा आनंद दूसरा कुठलाच असु शकत नाही.
विविध देशांना दुचाकीवरुण भेट देऊन, त्यांची वंश परंपरा, विविध जमाती, अन्न आणि संस्कृती , त्यांचा पेहराव, श्रद्धा आणि परंपरा  त्यांची घरे राहनीमान ह्या गोष्टी समझुन घेणे ही दोघांची इच्छा आहे.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या दरात कपात करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम,गिनीज बुकात नोंद डिसेंबर 5,...

हडपसर गोसावी वस्तीतील साजिद खानला पकडून २५ लाखाचे अंमली पदार्थ हस्तगत

पुणे - मेफेड्रॉन (एम.डी) या अंमली पदार्थाची विक्री करणारा...

भारतीयांच्या प्रेमाने, प्रतिसादाने भारावून गेलो-फ्रेंच नृत्यदिग्दर्शक झुआन ले यांची भावना

पुणे : "समकालीन नृत्य, हिप-हॉप, रोलर-स्केटिंग आणि दृश्यकाव्याचा अभिनव...

तरुणांनी पथनाट्यातून दिला बाल गुन्हेगारी रोखण्याचा संदेश

धनकवडी मधील आदर्श मित्र मंडळाचा शहरातील बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी...