महाराष्ट्रातील एकाही महापालिकेला नको तुकाराम मुंढे ….ठराव एकमताने मंजूर

Date:

नाशिक – महापालिका अायुक्त तुकाराम मुंढे यांच्या एककल्ली कारभाराचे पडसाद नागपूर येथील महापाैर परिषदेतही उमटले. मुंढे यांना राज्यातील कुठल्याही महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती न देण्याचा ठराव परिषदेत एकमताने मंजूर करण्यात अाला. याबराेबरच महापौरांना आर्थिक व प्रशासकीय अधिकार असावेत, सत्तेची सर्व सूत्रे आयुक्तांच्या हाती नसावीत, अधिकारांचे विकेंद्रीकरण केले जावे, अशा मागण्याही राज्य शासनाकडे सादर करण्यात अाल्या.

राज्यातील १९ शहरांच्या महापौरांच्या या परिषदेला उपस्थित राहिलेल्या नाशिकच्या महापाैर रंजना भानसी यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, ७४ व्या घटनादुरुस्तीने स्थानिक स्वराज्य संस्थांना बळकटी दिल्यानंतरही महापालिकांना अधिकार नाहीत.

नगराध्यक्षांच्या धर्तीवर महापालिकांच्या महापौरांना आर्थिक अधिकार मिळावेत. लाेकप्रतिनिधींचे नियमानुसार वैध ठरणारे अादेश डावलणाऱ्या आयुक्तांविरोधात कारवाईचे अधिकार महापौरांना असावेत, एकदा अंदाजपत्रक मंजुरीसाठी सादर केल्यानंतर पुन्हा मंजुरीसाठी महासभेवर प्रस्ताव न येणे अशा अडवणुकीबाबत परिषदेत कैफियत मांडली. विविध मागण्यांचे निवेदन महापौर भानसी यांनी परिषदेचे अध्यक्ष महाडेश्वर यांना सादर केले.
राज्यातील सर्व महापौरांच्या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना देण्यात अाले. दरम्यान, मुंढे यांची वर्तणूक, महापाैरांच्या अधिकाराचे हाेणारे हनन या पार्श्वभूमीवर त्यांना महापालिकेत नियुक्ती दिली जाऊ नये या मागणीचा ठराव अकाेल्याचे महापाैर विजय अग्रवाल यांनी मांडल्याचे भानसी यांनी सांगितले.

महापाैरांचे अधिकार वाढवणार
महापौरांचे अधिकार वाढविण्याबाबत विचार केला जाईल, असे फडणवीस यांनी परिषदेत सांगितले; मात्र त्याबराेबरच महापालिकांनी आर्थिक उत्पन्नाच्या स्त्रोतांत वाढ करावी, आर्थिक स्वावलंबनाकडे लक्ष पुरवावे अशा कानपिचक्याही दिल्या. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने समन्वयाने काम करावे, असे मतही यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले. याप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी, ‘९० टक्के नगरसेवक खर्च कसा करायचा याचाच विचार करतात. मात्र, मनपाचे उत्पन्न कसे वाढेल याचा विचार हाेत नाही’, अशी खंत व्यक्त केली.

महापाैरांना हवा राज्यमंत्रिपदाचा दर्जा
लाल दिवा काढून घेतल्यामुळे महापाैरपदाचा मान कमी झाल्याचे चित्र अाहे. या पार्श्वभूमीवर सर्वच महापौरांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा द्यावा, महापौरांना आर्थिक-प्रशासकीय अधिकार द्यावे, अायुक्तांनी चुकीचे काम केले तर कारवाईचा अधिकार हवा, अंदाजपत्रकातील मंजूर विषय महासभेवर यावेत, महापौर दौऱ्यासाठी विशेष निधीची तरतूद व्हावी

लाेकप्रतिनिधींचा सन्मान महत्त्वाचा
नाशिकच्या महापाैरांची कैफियत एेकून सर्वच महापाैर संतप्त झाले अाहेत. नुसता ठराव केला नाही तर मुख्यमंत्र्यांकडे विनंती करून मुंढे यांना काेणत्याही महापालिकेत नियुक्ती देऊ नये अशी मागणी करणार अाहाेत. लाेकप्रतिनिधींचा सन्मान महत्त्वाचा असून ताे झालाच पाहिजे.

– विजय अग्रवाल, महापाैर, अकाेला

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पाइपलाइन गॅस व सीएनजी वितरणासाठी केंद्र सरकारचा नवा आदेश: विना अडथळा खोदकाम करता येणार

पुणे : केंद्र सरकारने देशभरात नैसर्गिक गॅस व पेट्रोलियम...

पुण्यात ४२४ प्रकरणांत गंभीर फेरफार अनियमितता:महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील ‘कलम १५५’ चा गैरवापर

दोषींवर निलंबनासह कठोर कारवाईचे महसूल मंत्री बावनकुळे यांचे निर्देश जबाबदार...

हिंदवी स्वराज्य शपथभूमी श्री क्षेत्र रायरेश्वर येथे विशेष सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न

शाहिरी-गायन-वादन सादरीकरणातून स्वराज्य संकल्पनेचा जागर पुणे, दि. २६ मार्च :महाराष्ट्र...

शिवसृष्टी प्रकल्पासह शहराच्या मूलभूत प्रश्नांवर ठोस भूमिका – नगरसेवक हर्षवर्धन मानकर

पुणे महानगरपालिकेच्या सन २०२६–२७ च्या अंदाजपत्रकावर झालेल्या चर्चेदरम्यान नगरसेवक...