नगरसेवकांनी पायाभूत सुविधांचा अभ्यास केला पाहिजे : ​ ​ महापौर मुक्ता टिळक

Date:

पुणे : 
‘नगरसेवकांनी आपल्या प्रभागाचा अभ्यास जास्तीत जास्त केला पाहिजे. नागरिकांच्या प्रश्नाला , विनंतीला तातडीने उत्तर देईल, तो खरा ‘स्मार्ट’ नगरसेवक अशी संकल्पना नगरसेवकांची असावी, असे महापौर मुक्ता टिळक यांनी

​​

‘स्मार्ट पुण्याचा मी स्मार्ट नगरसेवक’विषयावरील कार्यशाळेत व्यक्त केले .

​​

​​

‘ज्ञानेश्वरी प्रतिष्ठान’ आणि धनंजय देशपांडे यांच्यातर्फे निवडून आलेल्या सर्व पक्षांच्या नगरसेवकांसाठी

​ आयोजित कार्यशाळे

​च्या उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून

त्या बोलत होत्या. ​

‘ज्ञानेश्वरी प्रतिष्ठान’ आणि धनंजय देशपांडे यांच्या

​वतीने आयोजित

या कार्यशाळेचे आज शनिवारी

​ हॉटेल

‘कोहिनूर एक्झिक्युटिव्ह’, आपटे रोड येथे

उद्घाटन झाले.

​यावेळी

​ ​

‘पुण्याच्या सर्वांगीण विकासामध्ये समर्पित भावनेने कार्यरत राहून हे शहर अधिक

​’​

स्मार्ट

​’​

करण्याची मी शपथ घेत आहे’,महापौर मुक्ता टिळक यांनी उपस्थित नगरसेवकांना ही शपथ दिली.​

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन

धनंजय देशपांडे ​

यांनी के

​ले

. ​

​यावेळी

‘ज्ञानेश्वरी प्रतिष्ठान’

च्या ​

डॉ.सायली कुलकर्णी उपस्थित होत्या.

​प्रसाद कुलकर्णी यांनी आभार मानले. ​
महापौर पुढे म्हणाल्या, ‘पायाभूत सुविधांचा अभ्यास केला पाहिजे.

​सध्या ​

कचरा आणि वाहतूक हे बिकट प्रश्न आहेत. यासाठी ‘झीरो गार्बेज’ सारखे प्रकल्प,

​नव्या

नगरसेवकांनी

नवीन संकल्पना

​मांडल्या

पाहिजेत

​,

अशी आशा त्यांनी व्यक्त केली. ​

​कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात

नवनिर्वाचित नगरसेवकांना

​​
​पुणे शहर राष्ट्रवादीचे काँग्रेसचे प्रवक्ते ​

अंकुश काकडे

​,​
​​ पुणे मनपाचे उपायुक्त

ज्ञानेश्वर मोळक

,

​​

धनंजय देशपांडे

​,

सुनील माळी आणि

डॉ. कल्पना बळीवंत

​ ​

यांनी मार्गदर्शन केले.

मार्गदर्शन करताना

​काकडे ​

म्हणाले, ‘विश्वासाला तडा जाऊ न देता काम करा. पहिली निवडणूक ही जिंकायला सोपी असते. पण दुसऱ्या निवडणूकीत ५ वर्ष केलेल्या कामावर निवडून

​दिले जाते​

. निवडणूकीपूर्वी आपण जसे होतो तसेच राहिले पाहिजे.

​’
​’​

आपल्या

प्र

भागात

​केलेले काम हे

आपणच केले असे न म्हणता महानगरपालिकेने काम केले आणि मी माध्यम म्हणून काम केले आहे, अशी भूमिका पाहिजे. महानगरपालिकेचे कामकाज समजायला वेळ लागतो त्यामुळे महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांशी सुसंवाद ठेवला पाहिजे, नगरसेवकाला प्रशासकीय अधिकार नसतात. नगरसेवकांना

​’​

स्मार्ट

​’​

व्हायचे असेल तर वाचनावर अधिक भर दिला पाहिजे. रोजची वर्तमानपत्रे वाचली पाहिजेत. प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करा

​.​
‘​
ज्ञानेश्वर मोळक म्हणाले, ‘महानगरपालिकेचे क्षेत्रीय प्रशासन आणि महानगरपालिकेचे कामकाज कसे चालते याविषयी सादरीकरणाच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. पुणे मनपाचे कामकाज समजून घेणे अवघड नाही फक्त तशी इच्छाशक्ती असली पाहिजे.
धनजंय देशपांडे यांनी स्वतःला ‘ब्रॅण्ड’ कसे करावे? याविषयी नगरसेवकांना मार्गदर्शन केले.

​नगरसेवकांनी ​

वक्तृत्व, भाषण कौशल्य, संभाषण कला अवगत केल्या पाहिजेत

​,​
​असे ते म्हणाले.

​सुनील माळी म्हणाले,

२०२२ साली पण तुम्ही सर्व नगरसेवक याच दिमाखात निवडून यायला पाहिजे

​.

यासाठी

‘स्मार्ट पुण्याचा मी स्मार्ट नगरसेवक’ या प्रकारच्या कार्यशाळा उपयुक्त ठरतील.

शहर हे वाढत आहे त्यानुसार विकासही होत आहे. शहरीकरण आणि विकास हातात हात घालून पुढे जातात. शहरीकरणाने अनेक प्रश्न उभे केले आहेत. नागरिकरणाचे प्रश्न हे शास्त्रशुद्ध आणि व्यवस्थित हाताळले गेले पाहिजे. त्यासाठी जागतिक प्रागतिक दृष्टीकोन यायला पाहिजे. कार्यक्षम प्रशासक आणि राजकीय इच्छाशक्ती असलेले नगरसेवक असण्याची या शहराला आणि महानगर पालिकेला गरज आहे.

महानगरपालिकेचे कामकाज समजून घेतले पाहिजे. पालिकेची संकल्पना समजून घेतली तर प्रभागात चांगले काम करू शकता. नागरिकांच्या नगरसेवकांकडून असणाऱ्या अपेक्षा लक्षात घ्यायला पाहिजेत. आपल्या प्रभागातील छोट्या छोट्या समस्यांची माहिती पाहिजे. ‘नागरीकांशी संपर्क’ हा ‘स्मार्ट’ संपर्क ठेवा. त्याकरिता सोशल मीडियाचा वापर करा. कचरा आणि वाहतूक या समस्या गंभीर आहेत. त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था हे वाहतूक समस्या सोडविण्याचे माध्यम आहे. नगरसेवकांनी जागतिक आणि आधुनिक दृष्टीकोन ठेवला पाहिजे.’

पुणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना बळीवंत यांनी सार्वजानिक आरोग्य व्यवस्थापन, महानगरपालिकेच्या वतीने देण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधा विषयी मार्गदर्शन केले . ​
​​

‘ज्ञानेश्वरी प्रतिष्ठान’ आणि धनंजय देशपांडे यांच्या

​वतीने आयोजित ​

कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात डॉ.विजय कुलकर्णी (

​’​

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट’चे पुणे विभाग प्रमुख) यांनी ‘पाच वर्षांच्या काळाचे कार्य नियोजन’, डॉ.दत्ता कोहिनकर यांनी ‘तणावमुक्ती व आंतरिक शक्ती विकास’ तर डॉ सायली कुलकर्णी यांनी ‘पुणेकर महिलांचे आरोग्य संवर्धन’याविषयी मार्गदर्शन केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

देशाला आकार देण्यात अभियंता-वास्तूविशारद यांची भूमिका महत्वपूर्ण: आर्कि. अभय पुरोहित

आर्किटेक्ट, इंजिनिअर्स अँड सर्व्हेयर्स असोसिएशनतर्फे 'एईएसए वार्षिक पुरस्कार' वितरण पुणे:...

लव फिल्म्सच्या ‘देवमाणूस’चा ट्रेलर प्रदर्शित

लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्सच्या 'देवमाणूस'...

सहाय्यक तंत्रज्ञानासाठी अनुकूल परिसंस्था विकसित करण्याबाबत निती आयोगाच्या वतीने पुण्यात कार्यशाळेचे आयोजन

पुणे- नीती आयोग, महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने 9 एप्रिल 2025 रोजी पुण्यात यशदा येथे “भारतामध्ये...

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक समता सप्ताह ! उद्घाटन संपन्न .

पुणे (दि.०८/०४/२०२५)- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय...