पुणे महापालिकेचे सह आयुक्त ज्ञानेश्वर मोळक यांची महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाने यासंदर्भातील आदेश आज दिले. महापालिकेत सध्या अतिरिक्त आयुक्तपदाची एक जागा रिक्त असून मोळक यांच्या माध्यमातून ही जागा भरण्यात आली आहे.
महापालिकेमध्ये अभियंता म्हणून नोकरीस सुरूवात केलेल्या मोळक यांनी महापालिकेच्या विविध विभागामध्ये काम पाहीले आहे. परिमंडळ उपायुक्त तसेस घनकचरा विभागामध्ये त्यांनी प्रमुख पदाची जबाबदारी पार पाडली आहे.मोळक यांच्यापुर्वी सह आयुक्त सुरेश जगताप हे पहिले महापालिकेचे अधिकारी होते ज्यांना अतिरिक्त आयुक्तपदी संधी मिळाली होती. जगताप हे काही महिन्यांपुर्वी सेवानिवृत्त झाल्यानंतर अतिरिक्त आयुक्तपदाची एक जागा रिक्तच होती.

