पुणे: बदलत्या काळात पुढाकार घेऊन काम करणाऱ्यांची कमतरता असून मानसिक आरोग्य क्षेत्रातील लोकांना एकत्रित करून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मनोदय मेंटल हेल्थ फोरमने या क्षेत्रातील लोकांचे प्रश्न सोडविण्यावर भर द्यावा अशी अपेक्षा जेष्ठ मानसोपचार तज्ञ व सिने अभिनेते डॉ मोहन आगाशे यांनी व्यक्त केली.
कर्वे समाज सेवा संस्था पुणे येथे मनोदय मेंटल हेल्थ फोरमच्या वतीने देण्यात येणाऱ्या जीवनगौरव पुरस्कार वितरण, समुपदेशन अभ्यासक्रमाचे उद्घाटन व पुस्तक प्रकाशन सोहळ्याप्रसंगी जेष्ठ मानसोपचार तज्ञ डॉ. उल्हास लुकतुके व डॉ. विद्याधर वाटवे यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार स्वीकारल्यानंतर मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते. कर्वे समाज सेवा संस्थेचे विश्वस्त संदीप खर्डेकर, फोरम चे सल्लागार डॉ सुप्रकाश चौधरी, कार्याध्यक्ष चेतन दिवाण यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्र. संचालक प्रा महेश ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडला.
डॉ मोहन आगाशे यांनी स्वत: अभिनय केलेल्या “आस्तु” व राष्ट्रीय परस्कार वेजेत्या “कासव” या सिनेमाच्या माध्यमातून मानसिक आरोग्याबाबत करण्यात आलेल्या प्रयत्नांचा उल्लेख करीत एक मानास्शाश्त्रज्ञ म्हणून असणार्या जबाबदार्यांवर प्रकाशझोत टाकला. ते म्हणाले, मानसिक आरोग्याच्या जागृतीसाठी माणूस कसा ओळखायचा या कलेपासून मानसशास्त्र शिकण्याची सुरुवात होते तसेच माणसाकडून वापरण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या चित्र, आवाज व भाषा या कलांच्या माध्यमातून उप जागृत व विवेकपूर्ण मनाचा अभ्यास करण्याची कला देखील मानसशास्त्रज्ञामध्ये असते. तसेच मानसिक आरोग्य क्षेत्रामध्ये कार्यरत असणार्या लोकांनी धीर व स्वीकार या गोष्टींचा अवलंब करण्याचे आवाहन देखील डॉ. मोहन आगाशे यांनी केले.
डॉ. लुकतुके म्हणाले डॉ मोहन आगाशे हे एक अनोखे व्यक्तिमत्व असून त्यांनी अभिनय व मानसिक आरोग्य या दोन्ही क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी केली असल्याने मिळालेला सन्मान हा त्यांच्या कार्याचा योग्य गौरव आहे.
डॉ वाटवे म्हणाले, डॉ आगाशे यांना देण्यात आलेला पुरस्कार हा त्यांचा योग्य सन्मान आहे. पुणे सारख्या शहरामध्ये मानसोपचार क्षेत्राला चांगले दिवस आणण्यासाठी सुरुवातीच्या काळापासूनच प्रयत्न केले असून मानसिक आरोग्याशी निगडीत सर्व संस्था, संघटना व विशेषता त्यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र इन्सटीटूट ऑफ मेंटल हेल्थ च्या स्थापनेमध्ये त्यांचा सिहाचा वाटा आहे.
संदीप खर्डेकर यांनी विशेष शैलीमध्ये आपले विचार व्यक्त करीत उपस्थितांना मार्गदर्शन केले, ते म्हणाले, नेता व अभिनेता यांच्यामध्ये समाजमन ओळखण्याची एक कला असते पण त्याही पेक्षा मोठी जबाबदारी डॉ. आगाशे व मानसिक आरोग्य क्षेत्रातील इतर व्यक्तींची असून त्यांना आवश्यक त्या सर्व प्रकारच्या मदतीसाठी आपण सदैव तत्पर आहोत.
डॉ शिरीष रत्नपारखी, डॉ सुप्रकाश चौधरी, प्रा. संचालक प्रा. महेश ठाकूर यांनी आपली मनोगते व्यक्त करून डॉ आगाशे व समुपदेशन अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व मेंटल हेल्थ फोरम च्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी डॉ सुप्रकाश चौधुरी व प्रा. चेतन दिवान लिखित “सायकीयॅट्री फॉरबिगिनर्स” या पुस्तकाचे तसेच प्रा. महेश ठाकूर व प्रा चेतन दिवान यांनी पुण्यातील जवळ-जवळ २६० संस्थांची इत्यंभूत माहिती असणार्या “संस्था मार्गदर्शिका” चे प्रकाशन डॉ मोहन आगाशे व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात दिप्प्रज्वालानाने करण्यात आली. प्रा. महेश ठाकूर, प्रा. चेतन दिवाण, राजेश अलोणे, स्नेहल सस्ताकारव प्रा दादा दडस यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. चेतन दिवाण यांनी केले. सूत्रसंचालन अनुपमा जोशीराव यांनी तर आभार शिल्पा तांबे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शितल कुटे, पल्लवी भागवत, सबनीस आढाव, प्रेमला घोरपडे, स्वाती पाध्ये, शीला संचेती, संदीप मोटे, अनिता सातव, तेजस घाडगे श्वेता बोंबे, प्रज्ञा थोरात यांनी परिश्रम घेतले

