पुण्यातील रविवार पेठेतील प्रल्हाद गवळी व सहकाऱ्यांचा पुढाकार : दिवाळी फराळ, कपडे व साहित्याचे वाटपपुणेः पुणे-दिवाळी हा प्रत्येकाने एकत्रीत येवून साजरा करण्याचा सण असतो. म्हणून घरच्यांपासून दुरावलेल्या आजी-आजोबांबरोबर दिवाळीचा पहिला दिवस साजरा करण्यासाठी पुण्यातील काही तरुणांनी पुढाकार घेत दिवाळी साजरी केली. आयुष्याच्या संध्याकाळी थरथरत्या हाताने आशेचा दिप लावत आजी-आजोबांनी देखील दिवाळीचा पहिला दिवस उत्साहात साजरा केला. नवे कपडे, फटाके उडवताना काही आजी आजोबा तर आपल्या बालपणात हरवले होते.

प्रल्हाद गवळी व सहकाऱ्यांनी पावटेआळी येथे आजी- आजोबांसोबत दिवाळीचा पहिला दिवस साजरा केला. यावेळी फरासखाना पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद, रविवार पेठ पोलीस चौकीच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रतीक्षा शेंडगे, शरदकाका गंजीवाले, शिरीष लोखंडे, नरेंद्र तांबोळी, गणेश भोकरे, संदीप ढवळे साईनाथ चकोर कैलास देवळे विक्रम लगड पवन कुलट नरेश देवकर अक्षय शेलार गौरव गवळी विकास गवळी उपस्थित होते. प्रल्हाद गवळी व सहकारी यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. यावेळी आजी आजोबांना नवीन कपडे, दिवाळीचा फराळ, आकाश कंदील, सुगंधी तेल, उटणे, साबण, अगरबत्ती, पणत्या या साहित्याचे वाटप करण्यात आले.
प्रतीक्षा शेंडगे म्हणाल्या, उतारवयात वयस्कर व्यक्तींना प्रेमाची व आपुलकीची गरज असते. आपल्या घरातल्यांबरोबर समाजातील इतर जेष्ठांची काळजी घेणे आपले कर्तव्य समजले पाहिजे.
प्रल्हाद गवळी म्हणाले, ज्या जेष्ठ व्यक्तींना कोणी सांभाळणारे नसते. जवळच्या नातेवाईकांनी साथ सोडलेली असते. अशा आजी-आजोबां बरोबर दिवाळी साजरा करण्याचा उपक्रम आम्ही राबवला आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून दरवर्षी असा उपक्रम राबविण्याचा संकल्प केला आहे.

