पुणे –
करोनाच्या काळात अडचणीत आलेले रिक्षा व्यावसायिक तसेच सलून व्यावसायिक यांना सामाजिक भावनेतून शुक्रवारी शिधा सामग्री किटचे वाटप करण्यात आले. महापालिकेतील सभागृह नेते गणेश बिडकर आणि मातोश्री नागरी सहकारी पतसंस्था यांच्या वतीने प्रभाग क्रमांक १६ येथे हा उपक्रम राबविण्यात आला. एक हजाराहून अधिक जणांना याचे वाटप करण्यात आले.
करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. शहरातील सलून व्यावसायिक तसेच हातावर पोट असलेल्या रिक्षा चालकांना त्याचा मोठा फटका बसला आहे. या व्यावसायिकांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह व्हावा, यासाठी सामाजिक दृष्टिकोनातून या शिधा किटचे वाटप करण्यात आल्याचे सभागृह नेते बिडकर यांनी सांगितले. यावेळी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, कॅन्टोन्मेंट मतदार संघाचे आमदार सुनील कांबळे, उपस्थित होते.
सामाजिक भावनेतून पालिकेचे सभागृह नेते बिडकर नेहमीच असे उपक्रम राबवित आहेत. रमजान निमित्त मुस्लिम बांधवांना साहित्याचे वाटप देखील त्यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. ही मोठी कौतुकास्पद बाब आहे. अशा शब्दात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बिडकर यांचे कौतुक केले. पुढील महिना ते दिड महिना पुरेल इतका शिधा यावेळी देण्यात आला.
गरजू रिक्षा व्यावसायिक तसेच सलून व्यावसायिक यांना शिधा सामग्री किटचे वाटप (व्हिडीओ)
Date:

