पुणे-महामारीने उदभवलेल्या संकटकाळी बुधवार पेठेतील देवदासींना फरासखाना पोलिसांच्या मदतीने पुढे आलेल्या दानशुरांच्या सहाय्याने अन्नधान्य आणि जेवणाचे वाटप करण्यात आले. एरवी ज्यांचा दरारा आणि कधी भीतीही वाटते त्याच पोलिसांकडून कधीकाळी अशी मदत होईल असे या महिलांना वाटलेही नसेल पण पोलिसातल्या माणसाने आणि त्यांच्या अशा हाकेला ओ देणाऱ्यांनी हा खारीचा वाटा उचलून अजूनही माणूसकी जिवंत आहे हे याची हलकीशी झलक दर्शविली.
जगासमोर यक्ष प्रश्न म्हणुन उभा असलेल्या कोरोनाच्या ससंर्गामुळे व वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वसामान्य जनतेच्या हातातील रोजगार बंद असल्यामुळे त्यांचेवर उपासमारीची वेळ आलेली आहे . त्यापैकीच एक घटक म्हणजे देहविक्री करणा – या महीला . पुणे शहरातील मध्यवर्ती भागात असणा – या बुधवार पेठ , पुणे येथे रेड लाईट एरियात शेकडो महीला वेश्याव्यवसाय करुन आपली उपजिवीका करतात.परंतु कोरोना संसर्गामुळे या महीलांनी आपली काळजी घेण्याबरोबरच स्वतःचा व्यवसाय बंद ठेवलेला आहे.त्यामुळे सदर महीलांची परिस्थिती बिकट होऊन त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहीला . कोरोना महामारीच्या दुस – या लाटेमुळे महाराष्ट्र शासनाने दिनांक ०२/०४/२०२१ रोजीपासुन राज्यात अंशतः लॉकडाऊन जाहीर केला . तेव्हा फरासखाना पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांनी पुणे शहरातील सामाजीक संस्थाशी संपर्क साधुन वेश्याव्यवसाय करणा – या महीलांकरता अन्नधान्य तसेच अत्यावश्यक सेवा पुरवण्याबाबत आवाहन केले . फरासखाना पोलीस स्टेशनकडुन करण्यात आलेल्या आवाहनास प्रतिसाद देत दिव्यांग इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अॅन्ड इंडस्ट्रीज पुणे आणि प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी पुणे व उद्योजक दानेश शाह व परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार पेठ पुणे येथील वेश्याव्यवसाय करणा – या महीलांना दिनांक १८/०४/२०२१ रोजीपासुन दररोज दुपारी फुड पॅकेट व त्यांच्या मुलांकरता दुधाचे वितरण करण्यात येत आहे . तसेच साधु वासवानी ट्रस्टकडुन अन्नधान्याचे किट वाटप करण्यात येत आहे . त्यामध्ये गव्हाचे पिठ , तांदुळ , डाळ , तेल , साखर , चहा पावडर , पोहे इत्यादी जीवनावश्यक वस्तुंचा समावेश आहे . आज दिनांक २३/०४/२०२१ रोजी वेश्याव्यवसाय करणा – या महीलांना अन्नधान्य तसेच तयार जेवनाचे पॅकेट व दुध यांचे वाटप करण्यात आले . यावेळी पोलीस उप – आयुक्त , परिमंडळ १ पुणे शहर , डॉ . प्रियंका नारनवरे , वरिष्ठ पोलीस निरीक्षक , फरासखाना पोलीस स्टेशन श्री राजेंद्र लांडगे , पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) श्री . राजेश तटकरे , पोलीस उपनिरीक्षक तेजस्वी पाटील , श्रीकांत सावंत , व साधु वासवानी ट्रस्टचे प्रकाश साधवानी , विजय तलरेजा व स्वयंसेवक , उदयोजक दानेश शाह व परिवार दिव्यांग इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अॅन्ड इंडस्ट्रीजचे संस्थापक अध्यक्ष , श्रीरघुनाथ येमुल गुरुजी व परिवार , प्रोगेसिव्ह एज्युकेशन सोसायटी , पुणेचे कार्याध्यक्ष डॉ.गजानन एकबोटे , सामाजिक कार्यकर्ते अलका गुजनाळ , सुरेश कांबळे हे हजर होते .

