पुणे : कोथरूड भागातील सामाजिक कार्यकर्ते अनिकेत मराठे या तरुणाने आपल्या 25 व्या वाढदिवसानिमित्त वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून 100 कोरोना योद्ध्यांनाआयुर्वेदिक हर्बल काढ्याचे वाटप केले. आयुष मंत्रालयाच्या निर्देशानुसार हा काढा तयार करण्यात आला आहे.रोग प्रतिकार शक्तिवर्धक असा हा काढा आहे.एरंडवणा भागातील पुणे महापालिकेचा थरकुटे दवाखाना, एरंडवणा अग्निशमन दल, महापालिका आरोग्य कोठी येथील सर्व कर्मचारी व आरोग्य सेवकांना काढा वाटप करण्यात आला.या प्रसंगी अजय मारणे,प्रदिप ठोंबरे, रवी बने, नितीन कोळेकर, निखिल धिडे, सौरभ कंधारे, शुभम कंधारे, गणेश पाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून कोरोना योद्ध्यांना आयुर्वेदिक हर्बल काढ्याचे वाटप
Date:

