कोरोना- सरदार पटेल रुग्‍णालयाला सव्‍वा दोन कोटी- जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम

Date:

पुणे- जिल्‍ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्‍याने जिल्‍हा प्रशासनाच्‍या वतीने अनेक उपाय योजनांद्वारे त्‍यावर मात करण्‍यासाठी प्रयत्‍न करण्‍यात येत आहे. जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी जिल्‍ह्यातील शासकीय रुग्‍णालयांप्रमाणेच खाजगी रुग्‍णालयांचीही या कामी मदत घेतली आहे. याचाच एक भाग म्‍हणून पुणे छावणी मंडळाच्‍या (पुणे कॅण्‍टोन्मेंट बोर्ड) सरदार वल्‍लभभाई पटेल रुग्‍णालयासाठी विशेष बाब म्‍हणून 2 कोटी 26 लाख रुपयांचा निधी अद्ययावत अतिदक्षता विभाग उभारणीसाठी उपलब्‍ध करुन दिला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे शहर आणि परिसरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील नागरिकांसाठी उपचारांची सुविधा उपलब्‍ध आहे. याच धर्तीवर छावणी परिसरातील नागरिकांना कोरोनाचा त्रास झाल्‍यास तातडीने उपचार त्‍या भागातच उपलब्‍ध व्‍हावेत, यासाठी सरदार पटेल रुग्णालयाला त्‍यांची यंत्रणा सज्ज ठेवण्‍यास सांगण्‍यात आले. लष्कर परिसरात एखाद्या व्‍यक्‍तीला कोरोनाची प्राथमिक लक्षणे आढळून आल्यास त्‍या व्‍यक्‍तीला विलग करण्यासाठी 50 खाटांचा विलगीकरण कक्ष उभारण्यात आला आहे. गरज भासल्यास या कक्षाची क्षमता शंभर ते 120 खाटांपर्यत वाढविण्यात येणार आहे. मात्र, कोरोनाबाधित रुग्णांवर तातडीने उपचार करण्यासाठी रुग्णालयात अतिदक्षता विभाग उभारण्याची गरज होती. त्यानुसार जिल्‍हाधिकारी राम यांनी मंडळाकडून प्रस्‍ताव मागवून घेतला आणि या प्रस्‍तावास प्राधान्‍याने मान्‍यता घेतली. राज्‍य सरकारकडून प्राप्‍त झालेला निधी मंडळाकडे वर्ग करण्‍यात आला आहे.

कोरोनाच्‍या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक नांदापूरकर यांनीही सरदार पटेल रुग्णालयाच्‍या प्रस्‍तावासाठी पाठपुरावा केला. बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडीयर कुलजित सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी अमित कुमार, सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.विद्याधर गायकवाड यांनीही लष्‍कर परिसरात आरोग्‍य व स्‍वच्‍छतेबाबत तसेच कोरोनाविषयक जनजागृतीसाठी आवश्‍यक ते उपाय योजण्‍याचे निर्देश दिले आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

भारताने बांगलादेशला 5,000 टन डिझेल पाठवले

भारताने आसाममधील नुमालीगढ रिफायनरीतून क्रॉस-बॉर्डर पाइपलाइनद्वारे बांगलादेशला डिझेल पाठवणे...

व्यावसायिक पुरवठा पूर्णपणे बंद झाल्याचे दावे दिशाभूल करणारे, शासनाकडून महत्त्वाचे आवाहन

आखाती देश इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे...

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच रेड्डी, ओबेरॉय यांना डी.लिट:टिळक विद्यापीठाचा 44 वा पदवीप्रदान सोहळा

पुणे- टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत,...