पुणे- स्वातंत्र्य सेनानी बिरसा मुंडा यांना जिल्हाधिकारी कार्यालयात आज अभिवादन करण्यात आले.
बिरसा मुंडा यांच्या जयंतीदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, निवासी उप जिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
०००००