पुणे, दि. १५ – भारतीय स्वातंत्र्याच्या ६९ व्या वर्धापना दिनानिमित्त राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते आज विधान भवनाच्या प्रांगणात ध्वज वंदन झाले. विधान भवन परिसरात सकाळी नऊ वाजता झालेल्या या शानदार समारंभास पालकमंत्री गिरीष बापट उपस्थित होते.
राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचे सकाळी नऊ वाजता विधानभवन येथे आगमन झाले. पालकमंत्री बापट आणि विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी त्यांचे स्वागत केले. त्यांतर राज्यपाल राव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राज्यपाल राव यांनी उपस्थित स्वातंत्र्यसैनिक, प्रशासकीय अधिकारी आणि नागरिकांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी पुण्याचे महापौर प्रशांत जगताप, आमदार भीमराव तापकीर आदी पदाधिकारी, स्वातंत्र्यसैनिक त्याचबरोबर समाजाच्या विविध स्तरातील नागरिक उपस्थित होते.
यावेळी सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी, नोंदणी महानिरिक्षक एन.रामास्वामी यशदाचे महासंचालक आनंद लिमये, महानगपालिकेचे आयुक्त कुणाल कुमार, जिल्हाधिकारी सौरभ राव, पोलीस आयुक्त रशी शुक्ला आदी अधिकारी उपस्थित होते.

