जिल्‍हाधिकारी राम यांची विविध कक्षांना भेट

Date:

पुणे- लोकसभा निवडणुकीसाठी स्‍थापन करण्‍यात आलेल्या विविध कक्षांना जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी आज भेट देऊन पहाणी केली. यावेळी निवासी उप जिल्‍हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उप जिल्‍हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह, तहसिलदार विकास भालेराव, जिल्‍हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग तसेच इतर अधिकारी उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीचे काम सुरळीत पार पाडण्‍यासाठी तसेच मतदारांच्‍या सुविधेसाठी विविध कक्ष स्‍थापन करण्‍याचे निर्देश देण्‍यात आले आहेत. त्‍यानुसार  जिल्‍हाधिकारी राम यांनी मतदार मदत केंद्र, तक्रार निवारण कक्ष,  जिल्‍हा नियंत्रण कक्ष, मतदार जागृती कक्ष (स्‍वीप), इव्‍हीएम व्‍यवस्‍थापन याबाबत पहाणी केली. निवडणूक विषयक प्रमुख घडामोडींची माहिती सर्वसामान्‍य नागरिकांपर्यंत पोहोचण्‍यासाठी विविध माध्‍यमांचा वापर करण्‍याच्‍या सूचना त्‍यांनी दिल्‍या. त्‍यासाठी डिजीटल बोर्ड, बॅनर तयार करण्‍यात यावेत, असेही त्‍यांनी सांगितले.  लोकसभा निवडणुकीसाठी मतदार यादीत ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज करण्‍यात आले असून त्‍यावर योग्‍य ते निर्णय घेण्‍याचे निर्देश जिल्‍हाधिकारी राम यांनी दिले. विहीत मुदतीत प्राप्‍त झालेले सर्व पात्र अर्ज मंजूर करण्‍यात  येतील, असे बैठकीत सांगण्‍यात आले. लोकसभा निवडणुकीच्‍या पार्श्‍वभूमीवर जिल्‍हाधिकारी राम हे मतदार संघ निहाय दौरा करणार आहेत. दौ-यात झोनल ऑफीसर्ससह इतर अधिका-यांची बैठक घेऊन निवडणूक पूर्वतयारीचा आढावा घेणार आहेत. यामध्‍ये कायदा व सुव्‍यवस्‍था, मतदान केंद्रे, तेथील सुविधा, संवेदनशील मतदान केंद्रे, आदर्श आचार संहिता, खर्च नियंत्रण कक्ष, मतदान यंत्रांच्‍या सुरक्षितेसाठी केलेल्‍या उपाययोजना, उपलब्‍ध कर्मचारी वर्ग या विषयांचा समावेश असेल.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

घायवळ टोळीतील मोकाचा फरार आरोपी अखेरीस पोलिसांच्या जाळ्यात

पुणे-गुंड निलेश गायवळ टोळीतील चार महिन्यांपासून फरार असलेल्या दोन...

लग्नानंतर तीन महिन्यांतच सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या: बाणेर परिसरातील घटना

पुणे-पुणे शहरातील बाणेर परिसरात हुंड्यासाठी छळ केल्याच्या आरोपावरून एका...

क्षेत्रीय कार्यालयांची रचना विशिष्ट राजकीय पक्षाच्या फायद्याची असल्याचा आरोप:आयुक्तांकडे लेखी तक्रार

पुणे -राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुणे महानगरपालिका आयुक्तांकडे क्षेत्रीय कार्यालये...