पुणे- राज्य निवडणूक आयोगाने पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील 86-खेड या पंचायत समिती गणाचा पोट निवडणूकीचा कायक्रम जाहीर केला आहे. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
सोमवार, 8 ऑगस्ट, 2016 रोजी निवडणूकीच्या तारखांची सूचना व निवडणूकीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी यांनी प्रसिध्द करण्याची तारीख. सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यत उमेदवाराचे नामनिर्देशनपत्र देणे व स्विकारण्यात येतील.
शुक्रवार,12 ऑगस्ट,2016 रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यत नामनिर्देशनपत्र देणे व स्विकारण्याची शेवटची तारीख आहे. 13 ते 15 ऑगस्ट,2016 पर्यत सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे नामनिर्देशनपत्रे देण्यात व स्वीकारण्यात येणार नाहीत.
मंगळवार,16 ऑगस्ट,2016 रोजी सकाळी 11-00 वाजल्यापासून नामनिर्देशनपत्राची छाननी व त्यावर निर्णय देणे. छाननीनंतर लगेचच वैध उमेदवाराची यादी प्रसिध्द करण्यात येईल.
शुक्रवार,19 ऑगस्ट,2016 रोजी नामनिर्देशनपत्राचा स्विकार करण्याबाबत किंवा ते नामंजूर करण्याबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांने दिलेल्या निर्णयाविरुध्द जिल्हा न्यायाधीशांकडे अपिल करण्याची शेवटची तारीख.
सोमवार, 22 ऑगस्ट,2016 रोजी जिल्हा न्यायाधीशांनी अपिलावर सुनावणी व निकाल देण्याची संभाव्य शेवटची तारीख.
सोमवार, 22 ऑगस्ट,2016 रोजी जिल्हा न्यायाधीशांनी अपील निकालात काढल्यावर वैध उमेदवारांची यादी प्रसिध्द करणे.
सोमवार, 22 ऑगस्ट,2016 रोजी जेथे अपील नाही तेथे सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यत नामनिर्देशनपत्र मागे घेणे. जेथे अपील आहे तेथे बुधवार, 24 ऑगस्ट,2016 रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यत नामनिर्देशनपत्र मागे घेणे.
सोमवार,22 ऑगस्ट,2016 रोजी दुपारी 3-30 वाजेनंतर जेथे अपील नाही तेथे निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करणे व निशाणी वाटप.
बुधवार,24 ऑगस्ट,2016 रोजी दुपारी 3-30 वाजेनंतर जेथे अपील आहे तेथे निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करणे व निशाणी वाटप.
सोमवार,22 ऑगस्ट,2016 रोजी मतदान केंद्रांची यादी प्रसिध्द करणे.
रविवार,28 ऑगस्ट,2016 रोजी सकाळी 7-30 ते 5-30 पर्यत मतदानाची तारीख.
सोमवार,29 ऑगस्ट,2016 रोजी सकाळी 10-00 वाजल्यापासून मतमोजणी. बुधवार, 31 ऑगस्ट,2016 रोजी निवडून आलेल्या सदस्यांची नावे प्रसिध्द करण्यात येईल.


