‘लोकसंवाद’ उपक्रमाद्वारे मुख्यमंत्र्यांनी साधला लाभार्थ्यांशी संवाद

Date:

पुणे :- शासनाच्या विविध योजना गरजूंपर्यंत पोहचल्यानंतर त्यातून होणारा लाभ, येणाऱ्या अडचणी आणि आवश्यक सुधारणा याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘लोकसंवाद’ उपक्रमाच्या माध्यमातून कृषि विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेच्या लाभार्थ्यांशी थेट संवाद साधून घेतली.

हा थेट लाईव्ह संवाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या www.twitter.com/Dev_Fadnavis  या ट्विटर हॅण्डलवर तसेच www.facebook.com/devendra.fadnavis या फेसबुक पेजवर आणि  www.youtube.com/DevendraFadnavis या युट्यूब चॅनलसह माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे ट्विटरwww.twitter.com/MahaDGIPR व www.facebook.com/MahaDGIPR या फेसबुक पेजसहwww.youtube.com/maharashtradgipr या युट्यूब चॅनलवर मोबाईल, संगणक, टॅब आणि लॅपटॉपद्वारे दाखवण्यात आला. त्याशिवाय http://elearning.parthinfotech.in/ या लिंकवर या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते.

राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी आखलेल्या विविध योजनांची राज्यात यशस्वीपणे अंमलबजावणी सुरु आहे. मागेल त्याला शेततळे, सिंचन विहिरी, फळबागा, कांदा चाळ, सूक्ष्म सिंचन, कृषी यांत्रिकीकरण,स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, अन्न प्रक्रिया, शेडनेट, पॉली हाऊस, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजना अधिक गतीने लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी राज्य शासनाचे प्रयत्न सुरु आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध जिल्ह्यांमध्ये आणि मंत्रालयातही या योजनांबाबत सातत्याने आढावा घेतला आहे.

मुख्यमंत्र्यांशी थेट संवाद साधताना, विविध जिल्हयातील लाभार्थ्यांनी कृषि विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा मिळालेल्या लाभाबद्दल मुख्यमंत्र्यांशी संवाद व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. शेतकऱ्यांच्यासाठी राबविण्यात आलेल्या योजनांमुळे शेतीमधून मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ झाल्याचे सांगतानाच कृषि विभागाच्या योजना ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत असल्यामुळे त्याचा फायदा मोठया प्रमाणात शेतकऱ्यांना झाल्याची भावना यावेळी व्यक्त लाभार्थ्यांनी केली.

महाराष्ट्र ॲग्रीटेक कार्यक्रमाची सुरुवात

शेतमालाला चांगला भाव मिळावा आणि पेरणीपासून ते कापणीपर्यतचा डेटा तयार करण्यासाठी इस्त्रो आणि एमआरसॅट यांच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या महाराष्ट्र ॲग्रीटेक कार्यक्रमाची सुरुवात मुख्यमंत्र्यांच्याहस्ते  लोकसंवाद कार्यक्रमानंतर करण्यात आली. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे आणि शेती सुजलाम सुफलाम होण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेण्यात येत आहे, अशी माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक धनकवडे उद्या करणार भाजपात प्रवेश

पुणे-केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि आमदार भीमराव तापकीर यांच्या...

पुणे, पिंपरीत भाजपचा महापौर होईल,भाजप राज्यात एक क्रमांकावर राहील-मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

पुणे -आगामी नगरपरिषद निवडणुकीत भाजप राज्यात एक क्रमांकावर राहील,...

‘भाजपा-शिवसेना पुणे महापालिका एकत्र लढणार’

शिवसेनेसोबत बैठकीनंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती पुणे, ...

काँग्रेसमध्ये इनकमिंग जोरात, मिरा भाईंदरमध्ये वेंचर मेंडोंसा व तारेन मेंडोंसा यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश.

भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका, महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला विजयी...