Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

कृषी विद्यापीठात हॉर्टीकल्चर संशोधन केंद्र सुरु करण्यासाठी प्रयत्न करणार : वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

Date:

पुणे :- नर्सरी व्यावसायिकांना शोभिवंत रोपांच्या उत्पादनात येणाऱ्या अडचणींसह अन्य समस्या सोडविण्यासाठी, कृषी विद्यापीठात हॉर्टीकल्चर संशोधन सुरु करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असे प्रतिपादन वित्त व वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केले.

            महाराष्ट्र नर्सरीमेन असोसिएशन व ग्लोबल कन्सल्टिंग यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी येथील हिंन्दुस्थान अँटीबॉयोटिक्स् च्या मैदानावर हॉर्टीकल्चरवर आधारित ‘हॉर्टीप्रो-2018’ हे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन वित्त व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी वन सचिव विकास खारगे, महाराष्ट्र नर्सरीमेन असोसिएशनचे अध्यक्ष संतोष सितोले, युएनआईडीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित पराशर व्यासपिठावर उपस्थित होते.

            याप्रसंगी बोलताना, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे कृषी व वनप्रेम आपण सर्वजण जाणतो आहोत. त्यांच्या प्रेरणेतूनच महाराष्ट्रातल्या जनतेने वन व कृषीप्रेमाची कास धरली आहे.या कार्याचा जागतिक पातळीवर प्रसार देखील महाराष्ट्राच्या भूमीतून होत आहे. अशा प्रकारचे प्रदर्शन भरवून महाराष्ट्र नर्सरीमेन असोसिएशनने नर्सरी उद्योगास एक नवी दिशा दिली आहे. आज भारतात असलेल्या एकूण रोजगारापैकी पन्नास टक्क्यांहून अधिक रोजगार कृषीवर अवलंबून आहे. अशा प्रकारच्या कार्यक्रमांमुळे कृषी क्षेत्राचा व पर्यायाने देशाचा विकास होण्यास मदत होते. भारतातील कृषी, नर्सरी व हॉर्टीकल्चर उद्योगाचा विकास करण्यासाठी प्रत्येक कृषी विद्यापीठात नर्सरी व हॉर्टीकल्चर संशोधन केंद्र स्थापन करणे गरजेचे आहे. त्याकरिता कृषि विभागाच्या सहकार्याने प्रयत्न करण्यात येईल. शेतीत किंवा नर्सरीत काम करताना एखादे संशोधन विकसित होऊ शकते. अशा संशोधनाचा फायदा सर्वांना मिळायला हवा, जेणेकरुन या क्षेत्राचा विकास होईल.

            सन 2050 पर्यंत पारंपारिक उर्जास्त्रोतांचा वापर बंद न केल्यास पृथ्वीवरील जीवन धोक्यात येण्याची शक्यता आहे, असे संशोधनातून लक्षात आले आहे. यासाठी नवीन ऊर्जास्त्रोतांचा वापर करणे काळाची गरज आहे. निसर्गाचा समतोल राखण्याचे कार्य वने करत असतात, त्यामुळे वनसंवर्धन व त्यातून आधुनिक विकास साधणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. प्रदर्शनात उभारण्यात आलेल्या विविध संस्थांच्या स्टॉलला वनमंत्र्यांनी भेट दिली व उत्पादनांची माहिती घेतली.

             महाराष्ट्र नर्सरीमेन असोसिएशनचे अध्यक्ष संतोष सितोले यांनी,  हॉर्टीकल्चर क्षेत्राने सर्वात मोठा निर्यातदार, रोजगार पुरवठादार, गरीब आणि किरकोळ शेतकऱ्यांसाठी दारिद्य निर्मूलक आणि लाखो भारतीयांसाठी जीवन परिवर्तक म्हणून स्थापित केले आहे, असे सांगितले. प्रदर्शनादरम्यान दहा चर्चासत्रांचे आयोजन केले असून त्याद्वारे  तंत्रज्ञान, वैज्ञानिक नवकल्पना, व्यवसाय मॉडेल, नेटवर्किंग आणि सहयोग संधींवर प्रदर्शन आणि कल्पना करण्याच्या संधी मिळेल अशी माहिती त्यांनी दिली.

            युएनआईडीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित पराशर यांनी, हॉर्टिप्रो-इंडिया बागकाम क्षेत्रातील नामवंत संस्थांबरोबर  नेटवर्किंग, कल्पनांची देवाण-घेवाण आणि व्यावसायिक भागीदारीच्या संधी प्रदान करेल असा विश्वास यावेळी बोलताना व्यक्त केला. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय क्षेत्रातील प्रसिध्द व्यक्तींनी या कार्यक्रमात त्यांच्या पूर्ण क्षमतेने सहभाग घेतला आहे. त्यामुळे नवीन व होतकरू व्यावसायिकांना आपल्या व्यवसायात येणाऱ्या काळात भागीदार देखील करून घेतील, अशी अपेक्षा व्यक्त केली.

            हॉर्टीप्रो-2018 या आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व परिषदेत शेती, बागकाम, फ्लोरिकल्चर, एग्रीप्रिनेरशिप आणि हाय-एंड टेक्नॉलॉजीचा वापर करून त्याचा विकास करण्यावर भर देण्यात आला आहे. यामुळे शेतकरी व शेतीपूरक व्यावसायिकांना त्याचा फायदा होणार आहे. या प्रदर्शनात पिक कापणी आधी व नंतरच्या अडचणी, बाजारपेठ जोडणी तसेच स्टार्ट अप व्यवसायातील संधी यासारख्या अनेक विषयांवर  कार्यशाळा घेण्यात येणार आहे. संशोधक, तंत्रज्ञ, विद्यार्थी, सल्लागार, इंजिनियर, विस्तार एजंट, उत्पादक, व्यापारीवर्ग, पॉलीसी मेकर्स व अन्य लोकांना प्रदर्शनाच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. 40 हजार स्क्वेअर मीटरच्या विस्तीर्ण परिसरात प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात हॉर्टीकल्चरवर आधारित व्यवसायाच्या संधीवर मार्गदर्शन करण्यात येणार असून आंतरराष्ट्रीय तज्ञांच्या विविध विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत.

            केंद्र सरकारचे कृषि व प्रक्रिया खाद्य उत्पादन निर्यात प्राधिकरण, नेदरलँडचा दूतावास, कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन  हॉर्टीकल्चर, इंडो-इटालियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज, ब्रिक्स अलियान्झ, इंडियन सोसायटी ऑफ ॲग्री बिझनेस प्रोफेशनल्स, आन्त्रप्रेनर असोसिएशन ऑफ इंडिया, स्टार्ट अप इंडिया, बिहार आन्त्रप्रेनर असोसिएशन, बोउगैनविला सोसायटी ऑफ इंडिया, इंडियन सोसायटी ऑफ ओर्नामेंटल हॉर्टीकल्चर  संस्थांच्या सहकार्याने आयोजित प्रदर्शन 18 नोव्हेंबरपर्यत सर्वांसाठी खुले राहणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

विमान वाहतूक कोसळली: काय म्हणाले मंत्री मोहोळ

इंडिगोने पायलटच्या कामाची वेळ पाळली नाही: ४ सदस्यीय चौकशी...

अजित पवारांबरोबर नाहीच , महाविकास आघाडी म्हणूनच लढणार, खुद्द शरद पवारांची मान्यता – प्रशांत जगताप

पुणे- गेल्या काही दिवसांपासून पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस...