बकरी ईद सण शांततेत साजरा करण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Date:

मुंबई : राज्यात बकरी ईदचा सण शांततेत साजरा व्हावा, यासाठी प्रशासनाने योग्य दक्षता घेतली आहे. याकाळात वाहतूक व्यवस्था सुरळीत रहावी, यासाठी पोलिसांनी नियोजन करावे. हा सण शांततेने चांगल्या प्रकारे साजरा व्हावा यासाठी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

बकरी ईद सणानिमित्त राज्यातील कायदा व सुव्यवस्था संदर्भात तसेच मुंबईतील व्यवस्थेबाबतची आढावा बैठक मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात झाली. यावेळी पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, गृह राज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर, आमदार आशिष शेलार, माजी मंत्री नसीम खान, आमदार वारीस पठाण, अमीन पटेल, अस्लम शेख,  गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सुनील पोरवाल, बृहन्मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, परिवहन विभागाचे प्रधान सचिव आशिष कुमार सिंह, पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर, पोलीस आयुक्त सुबोध जयस्वाल यांच्यासह अधिकारी व शांतता समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, गेल्या चार वर्षात अतिशय चांगल्या प्रकारे बकरी ईदचा सण साजरा करण्यात आला आहे. यंदाही शांततेत व चांगल्याप्रकारे हा सण साजरा करावा. सणाच्या काळात कोणतेही अनुचित प्रकार घडू नयेत, यासाठी पोलीसांनी योग्य ती सावधगिरी बाळगावी.

बकरी ईदसाठी मुंबईतील देवनार पशुवधगृह येथे महापालिकेने चांगल्या सुविधा निर्माण केल्या आहेत. तेथे पाणी साचून बकऱ्यांना त्रास होऊ नये, यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात तसेच स्वच्छता, पशुवैद्यकीय चिकित्सा यासाठी पुरेसे अतिरिक्त मनुष्यबळ पुरविण्यात यावेत. पशुवधगृहात येणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी वाहतूक विभागाने दक्षता घ्यावी. तसेच तेथे सुरक्षेसाठी अतिरिक्त पोलीस चौकी उभारावी. पूर्व मुक्त महामार्गावर गाड्या अडविल्यामुळे वाहतूक थांबणार नाही, याची काळजी घ्यावी.

सणाच्या काळात मदतीसाठी गेल्यावर्षीप्रमाणेच मुंबई व राज्यासाठी वेगवेगळे हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात यावे. राज्याच्या सीमा तपासणी नाक्यांवर जनावरे घेऊन येणाऱ्या वाहनांना जास्तकाळ थांबवून ठेवू नये, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधींनी गेल्या चार वर्षात राज्य शासनाने बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या सुयोग्य सोयीसुविधांबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानले व यंदाही बकरी ईदचा सण शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करण्यात येणार असल्याचे सांगितले.

देवनार पशुवधगृहातील सुविधा

– 10 लाख लिटर पाण्याच्या  पुरवठ्याची क्षमता,

– 60 ठिकाणी पाणपोईच्या सोयी,

– 8 तात्पुरती शौचालय, महिलांसाठी स्नानगृहे,

– 88 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे,

14 ठिकाणी फूड झोन,

– 64 एकरात 55 व़ॉकीटाकीच्या सहाय्याने लक्ष ठेवणार

– पशुंची माहिती व्हावी, यासाठी परिसरात डिजिटल इंडिकेटर,

– 15 पोलीस सहायता कक्ष,

– जनावरांसाठी पशु वैद्यकीय दवाखाने

– पशुखरेदी विक्रीसाठी येणाऱ्यांच्या माहितीसाठी पत्रकांचे वाटप

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

घरगुती एलपीजी  सिलेंडर्सचा पुरवठा सुरळीत; टंचाईच्या भीतीने केल्या जाणाऱ्या  नोंदणीत घट- सरकारचा दावा

सरकारकडून राज्यांना व्यावसायिक एलपीजी वाटपात वाढ; प्रमुख क्षेत्रांना प्राधान्य आणि...

भोंदूबाबाला मदत करणाऱ्या सर्वांचीच नावे जाहीर करून कारवाई करा -रवींद्र माळवदकर

पुणे- भोंदू बाबा खरातला डायरेक्ट इनडायरेक्ट मदत करणाऱ्या सर्वपक्षीय...

राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण:बारा हजाराहून अधिक विद्यार्थिनी व शिक्षकांनी घेतला लाभ

मुलींच्या स्वसंरक्षणाच्यादृष्टीने महत्त्वाचा उपक्रम- शालेय शिक्षण मंत्री दादाजी...

रिपब्लिकन पक्षाला राष्ट्रीय पक्ष मान्यता मिळवून देणार:रामदास आठवले यांचा निर्धार

पुणे ;  रिपब्लिकन पक्षाला सर्वसमावेशक स्वरूप प्राप्त करून देऊन राष्ट्रीय...