रुग्‍ण कल्याण समित्‍यांचा जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी घेतला आढावा

Date:

पुणे- राष्‍ट्रीय ग्रामीण आरोग्‍य अभियान  तसेच राष्‍ट्रीय आरोग्‍य अभियानांतर्गत रुग्‍ण कल्‍याण नियामक समित्‍यांची आढावा बैठक जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज घेतली. रुग्‍णांच्‍या उपचारासाठी येणारा निधी आरोग्‍य शिबीर आणि अत्‍यावश्‍यक औषध खरेदीसाठी वापरावा, अशा सूचना त्यांनी दिल्‍या. बैठकीस जिल्‍हा परिषदेचे अतिरिक्‍त मुख्‍य कार्यकारी अधिकारी नृसिंह मित्रगोत्री,  जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक डॉ. अशोक नांदापूरकर, जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी दिलीप माने, जिल्‍हा क्षयरोग अधिकारी संजय दराडे, डॉ. एन.जी. ढवळे आदींसह इतर सदस्‍य उपस्थित होते.

प्रारंभी जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी गेल्‍या आर्थिक वर्षातील खर्चाचा आढावा घेतला. या वर्षातील नियोजनाप्रमाणे खर्च करण्‍याचे निर्देशही त्‍यांनी दिले. उरो रुग्‍णालय, प्रादेशिक मनोरुग्‍णालय, कुष्‍ठरोग रुग्णालय यांच्‍या खर्चाचा आढावा घेण्‍यात आला.  राष्‍ट्रीय ग्रामीण आरोग्‍य अभियानांतर्गत प्रजनन व बाल आरोग्‍य कार्यक्रम, नियमित लसीकरण, आशा योजना, महत्‍त्वाचे आजार नियंत्रण कार्यक्रम याशिवाय माता बाल संगोपन कार्यक्रम, जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृवंदन योजना यांचाही यावेळी आढावा घेण्‍यात आला.

जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. माने यांनी जिल्‍ह्यात 96 प्राथमिक आरोग्य केंद्रे, 539 उपकेंद्रे, 13 आयुर्वेदीक दवाखाने, 26 ग्रामीण रुग्णालये, 3 तरंगते दवाखाने, 11 आरोग्य पथके कार्यरत असल्‍याचे सांगितले. जिल्‍ह्यात 125 रुग्ण कल्‍याण समित्‍या असून त्‍यांच्‍या नियमित बैठका होत असल्‍याचेही त्‍यांनी सांगितले. प्रधानमंत्री मातृवंदन योजनेत पुणे जिल्‍हा राज्‍यात दुस-या क्रमांकावर असल्‍याचे यावेळी सांगण्‍यात आले.

 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

फ्युएल शिक्षण संस्था समूह तर्फे वार्षिक कॉन्क्लेव्ह व फ्युचर स्किल्स समिट ६ फेब्रुवारी रोजी

पुणे, दि. ४ फेब्रुवारी: फ्युएल शिक्षण संस्था समूहातर्फे ‘वार्षिक...

फ्रॅक्टल अॅनालिटिक्स लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री 09 फेब्रुवारी 2026 पासून

·         फ्रॅक्टल अॅनालिटिक्स लिमिटेड (“कंपनी”)च्या प्रत्येकी 1 रुपये दर्शनी मूल्याच्या प्रति...

TCS BaNCS™ तैनात-जनता सहकारी बँकेमध्ये ग्राहकांना मिळणार नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाद्वारे सुधारित आणि जलद डिजिटलसेवा

बँकेच्या सर्व सेवा एकत्रित करणारी एक नवीन, आधुनिक प्रणाली प्रदान करण्यासाठी टीसीएस तिच्या प्रगत आणि पुरस्कार विजेत्या बँकिंग सॉफ्टवेअरचा वापर करेल. यामुळे बँकेला नवीन सेवा जलद सुरू करता येतील, ग्राहकांना चांगली सुविधा मिळेल आणि तिचे संपूर्ण बँकिंग ऑपरेशन्स डिजिटल करता येतील. पुणे, मुंबई, : जनता सहकारी बँक पुणे (JSBL) ने तिच्या आधीच्या बँकिंग प्रणालीचे आधुनिकीकरण करण्यासाठी, कार्यक्षमता वाढविण्यासाठी आणि उत्कृष्ट ग्राहक सेवा प्रदान करण्यासाठी TCS BaNCS™ या जागतिक बँकिंग प्लॅटफॉर्मची निवड केली आहे. आयटी सेवा, सल्लागार आणि व्यवसाय उपाययोजना पुरवणारी, जागतिक पातळीवरील आघाडीची कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (BSE: 532540, NSE: TCS), जनता सहकारी बँकेच्या ग्राहकांसाठी एक सुधारित बँकिंग अनुभव निर्माण करेल. TCS BaNCS चे आधुनिक डिजिटल चॅनेल ग्राहकांना बँकेच्या वेबसाइट, मोबाइल अॅप आणि ऑफलाइन शाखांमध्ये अखंड सेवा प्रदान करतील. TCS BaNCS ग्लोबल बँकिंग प्लॅटफॉर्मद्वारे समर्थित, जनता सहकारी बँक पुणे तिच्या बँकिंग प्रणालीमध्ये संपूर्ण परिवर्तन घडवून आणत आहे. यामध्ये कोअर बँकिंग, पेमेंट्स, ट्रेड फायनान्स आणि AML/KYC अनुपालनाचे आधुनिकीकरण यांचा समावेश असेल. बँकेचा उद्देश तिच्या वाढीला गती देणे, सर्व चॅनेलवर (मोबाइल, वेब आणि शाखा) उत्कृष्ट ग्राहक अनुभव प्रदान करणे आणि बाजारपेठेतील उपस्थिती मजबूत करणे आहे. या परिवर्तनामुळे बँकेची कार्यक्षमता वाढेल, कर्जाची गुणवत्ता सुधारेल आणि जोखीमांवर चांगले नियंत्रण येईल. शिवाय, या तंत्रज्ञानामुळे बँकेला सायबर सुरक्षा आणि डिजिटल बँकिंग मार्गदर्शक तत्त्वे यासारख्या रिझर्व्ह बँकेच्या नवीन नियमांचे पालन करण्यास सक्षम केले जाईल. जनता सहकारी बँक पुणेची स्थापना १८ ऑक्टोबर १९४९ रोजी झाली. पुण्यातील सहकारी संस्थांना पाठिंबा देण्यासाठी आणि समाजोपयोगी कल्याणकारी उपक्रम म्हणून सुरू झालेली ही बँक आता भारतातील सहकारी बँकिंग क्षेत्रातील एक प्रमुख बँक आहे. आपल्या देशव्यापी नेटवर्कद्वारे, बँक व्यक्ती आणि लहान व्यवसायांना बचत खाती, कर्जे आणि आधुनिक डिजिटल सेवा देते. उत्कृष्ट ग्राहक सेवा प्रदान करण्यासाठी, बँक स्वतःचे डिजिटलीकरण करण्यासाठी आणि नवीन वैशिष्ट्ये सादर करण्यासाठी सक्रियपणे काम करण्यात आघाडीवर आहे. जनता सहकारी बँक पुणेचे सीईओ श्री जगदीश पी. कश्यप म्हणाले: "जनता सहकारी बँकेत, आमच्या ग्राहकांच्या आर्थिक गरजा समजून घेणे आणि त्यांना उत्कृष्ट बँकिंग अनुभव प्रदान करणे हे राहिले आहे. आमच्या डिजिटल प्रणालींचे आधुनिकीकरण करण्यासाठी आम्ही TCS BaNCS सोबत भागीदारी करून एक मोठे पाऊल पुढे टाकले आहे. या परिवर्तनामुळे आम्हाला आमच्या ग्राहकांना जलद आणि सोप्या डिजिटल सेवा प्रदान करता येतील. ग्राहकांची सुविधा हे आमच्या प्रत्येक कामाचे प्राधान्य राहावे हे आमचे उद्दिष्ट आहे." टीसीएसच्या फायनान्शियल सोल्युशन्स विभागाचे ग्लोबल हेड श्री. वेंकटेश्वरन श्रीनिवासन म्हणाले: "जनता सहकारी बँकेसोबत भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे. आम्ही भारतातील शहरी सहकारी बँकिंग क्षेत्राला आधुनिक आणि सुरक्षित बँकिंग तंत्रज्ञान प्रदान करण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहोत. आम्ही या बँकेसाठी एक आधुनिक प्रणाली सादर करत आहोत जी केवळ या क्षेत्राच्या अद्वितीय गरजा पूर्ण करत नाही तर जागतिक पातळीवरील सर्वोत्तम बँकिंग पद्धतींचा देखील समावेश करते. यामुळे ग्राहकांचा अनुभव वाढेल, नियामक अनुपालन सोपे होईल आणि बँकेला नवीन उत्पादने लाँच करण्यास आणि बाजारपेठेतील तिची स्थिती मजबूत करण्यास सक्षम केले जाईल." टीसीएसच्या सहयोगाने विकसित केलेल्या या नवीन प्रणालीमुळे  ग्राहकांना डिजिटल खाती उघडणे आणि स्वतःच्या बँकिंगचे (स्वयं-सेवा) व्यवस्थापन करणे खूप सोपे होईल. यामुळे बँकेचे कामकाज अधिक अचूक आणि जलद होईल आणि ग्राहकांना विविध आधुनिक सेवांचा फायदा होईल. स्केलेबल एपीआय-आधारित तंत्रज्ञान बँकेला बाजारपेठेतील बदलांशी त्वरित जुळवून घेण्यास सक्षम करेल, ग्राहकांना नेहमीच सर्वात आधुनिक आणि प्रगत बँकिंग वैशिष्ट्यांचा लाभ मिळेल याची खात्री करेल. याव्यतिरिक्त, बँक तिची ट्रेड फायनान्स ऑपरेशन्स पूर्णपणे डिजिटलाइज करण्यात सक्षम बनेल. यामुळे पैशाचे व्यवहार त्वरित होतील, जोखीम ओळखणे सोपे होईल आणि सरकारी नियमांचे चांगले पालन आणि देखरेख सुनिश्चित होईल. TCS...

बेन कॅपिटल समर्थित धूत ट्रान्समिशनतर्फे आयपीओसाठी सेबीकडे गोपनीय पद्धतीने अर्ज दाखल

ऑटो घटक उत्पादक धूत ट्रान्समिशन यांनी संभाव्य प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) च्या...