Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

बारवी धरणातील पाण्यामुळे आपत्ती ओढवू नये यासाठी विशेष खबरदारी – उद्योगमंत्री सुभाष देसाई

Date:

मुंबई : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने या पावसाळ्यात बारवी धरणासंदर्भात  विशेष खबरदारी घेतली आहे. सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे आपत्ती ओढवू नये यासाठी ओव्हर फ्लो होण्याआधीच  ( Hydro Generation )  जलविद्युत निर्मितीसाठी पाण्याचा वापर केला, त्यामुळे गावांच्या दिशेने होणारा पाण्याचा फुगवटा कमी झाला आणि  रस्ते पाण्याखाली जाण्याचे टळले आहे,  अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

श्री. देसाई म्हणाले, कोळेवडखळ या गावाला असलेला पुराच्या पाण्याचा संभाव्य धोका लक्षात घेऊन इथे होड्या सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.   पुराच्या पाण्याच्या अभ्यासासाठी पहिल्यांदाच ड्रोनने सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. रात्रंदिवस सतर्क राहणारे पथक रेस्क्यू टीम (Rescue Team) कार्यरत आहे. आपत्कालीन मदतीसाठी टोल फ्री क्रमांक 180 023 343 96 कार्यान्वित करण्यात आला आहे. तर, मुरबाड येथे आपत्कालीन केंद्रही तयार करण्यात आले आहे. या साठी dmcellbarvidam@midcindia.org या ई मेल पत्त्यावर संपर्क साधता येणार आहे.

बारवी धरणातून पाणी ओव्हरफ्लो झालेल्या अंबरनाथ तालुक्यातील अनसोली, राहतोली, चोण, सागाव, पाटीलपाडा, चंदनपाडा, पादिरपाडा, पिंपळोली, करंद या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय तोंडली, काचकोली व संलग्न पाडे, मोहघर, कोळेवडखळ, मानिवली, सुकाळवाडी हे अतिबाधित होत असून येथे रस्ते पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. या ठिकाणीही  विशेष काळजी घेण्यात येत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून  या  परिसरात नदीच्या बाजूस तात्पुरते बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत.

तोंडली येथील  286 कुटुंबाना खावटी खर्च  देण्यात आला  आहे. यात एकवेळ  खर्च म्हणून  रु.10 हजार, किराणा मालासाठी रु.  5 हजार आणि मिनरल वॉटरसाठी रु. 2 हजार 790 धनादेशाद्वारे देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे काचकोली पाडयांसाठीही खावटी खर्च देण्यात आला आहे. जुलै महिन्याचा हा खर्च अदा करण्यात आला असून आवश्यकता भासल्यास ऑगस्ट व  सप्टेंबर पर्यंत हा खावटी खर्च देण्यात येईल.

पूरग्रस्त घरातील 20 परिवारांना मुरबाड येथे भाडयाच्या  घरात हलविण्यात आले आहे. तर 45 लोकांना  लोवर तोंडली येथील तात्पुरत्या शेडमध्ये हलविण्यात आले आहे. तसेच तेथील अडचणींचा विचार करता व लोकांच्या मागणीनुसार त्यांना तोंडली गाव येथे नवीन 45 शेड बांधून स्थलांतरित करण्यात येणार आहे. या शेडचे बांधकाम सुरु आहे. त्याचप्रमाणे काचकोली येथे लोकांच्या मागणीनुसार 19 शेडचे बांधकाम सुरु आहे.

इतर भागातील लोकांसाठी तात्पुरते शेडस् उभारण्यात आले आहेत. त्यांच्यासाठी  वीज, डी.जी.सेट, पिण्याचे पाणी आणि वाहनांची 24 तास  सज्जता ठेवण्यात आली आहे. तोंडली व कोचकोली येथील उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या शेडच्या दुरुस्तीचे कामही हाती घेण्यात आलेले आहे.  त्या अंतर्गत त्यांना शौचालय व बाथरुमची व्यवस्था करण्यात येत आहेत. काचकोली येथील जांभुळवाडी व कोळेवडखळ येथे पिण्याच्या पाण्यासाठी बोअरवेल उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. या सर्व मोहिमेत जिल्ह्याची महसूल यंत्रणा संपूर्ण सहकार्य देत आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

जा मोदींना जाऊन सांग,शिवमोग्गाच्या मंजुनाथ यांना मारल्यावर त्यांच्या पत्नीला आतंकवादी म्हणाला…

काश्मीरचे विभागीय आयुक्त विजयकुमार बिदरी यांनी सांगितले कि,', महाराष्ट्रातील...

पत्नी मुलांसमोरच दहशत वाद्यांनी घातल्या IB अधिकाऱ्याला गोळ्या

नवी दिल्ली- जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात...

देश विदेशातून हल्ल्याची गंभीर दखल,मेहबूबा मुफ्तींकडून काश्मीर बंदचे आवाहन

मुंबई- पहलगाम येथी पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याची देशातूनच नव्हे तर...

नावे विचारून घातल्या गोळ्या,महाराष्ट्र आणि पुण्यातील पर्यटकांवर देखील हल्ला

पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध...