क्रांतीवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाने केलेल्या शिफारशींची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी – सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले

Date:

मुंबई : मातंग समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी गठीत केलेल्या क्रांतीवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाने केलेल्या शिफारशींची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी आज दिले.

क्रांतीवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाने केलेल्या शिफारशींच्या अनुषंगाने आढावा बैठक मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सचिव दिनेश वाघमारे व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

श्री. बडोले म्हणाले, क्रांतीवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाने केलेल्या शिफारशी या मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त आहेत. बेरोजगार तरुणांना रोजगार, मातंग समाजातील महिला बचत गट स्थापन करण्यासाठी विशेष प्रोत्साहन, दारिद्रय निर्मूलन करण्यासाठी विशेष कृती कार्यक्रम, सरकारी स्वस्त धान्य दुकान, रॉकेल, गॅस व पेट्रोल एजन्सी मातंग समाजातील बेरोजगार तरुणांना विशेष प्राधान्यक्रमाने देण्यात यावे. मातंग समाजातील विद्यार्थ्यांसाठी राज्यात पुणे व औरंगाबाद येथे वसतीगृह,  पाच ठिकाणी निवासी शाळा स्थापन करण्याबाबतची कार्यवाही त्वरित करण्याचे निर्देश यावेळी श्री. बडोले यांनी दिले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पाइपलाइन गॅस व सीएनजी वितरणासाठी केंद्र सरकारचा नवा आदेश: विना अडथळा खोदकाम करता येणार

पुणे : केंद्र सरकारने देशभरात नैसर्गिक गॅस व पेट्रोलियम...

पुण्यात ४२४ प्रकरणांत गंभीर फेरफार अनियमितता:महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील ‘कलम १५५’ चा गैरवापर

दोषींवर निलंबनासह कठोर कारवाईचे महसूल मंत्री बावनकुळे यांचे निर्देश जबाबदार...

हिंदवी स्वराज्य शपथभूमी श्री क्षेत्र रायरेश्वर येथे विशेष सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न

शाहिरी-गायन-वादन सादरीकरणातून स्वराज्य संकल्पनेचा जागर पुणे, दि. २६ मार्च :महाराष्ट्र...

शिवसृष्टी प्रकल्पासह शहराच्या मूलभूत प्रश्नांवर ठोस भूमिका – नगरसेवक हर्षवर्धन मानकर

पुणे महानगरपालिकेच्या सन २०२६–२७ च्या अंदाजपत्रकावर झालेल्या चर्चेदरम्यान नगरसेवक...