पुणे दि. 27 : “सर्वांसाठी परवडणारी घरे” हा शासनाचा उपक्रम साध्य करण्यासाठी म्हाडा ,पुणे मंडळाच्या माध्यमातून प्रयत्न होत आहेत. पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळातर्फे दिनांक 17.052018 रोजी 3139 सदनिका व 29 भूखंडासाठी वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. या सदनिका व भूखंडाच्या जाहिरातीमध्ये पुणे,सातारा, कोल्हापूर, सोलापुर जिल्हयातील विविध ठिकाणच्या योजनांचा समावेश आहे. या जाहिरातीस अनुसरून सुमारे 40,000 नागरीकांनी योजनेमध्ये प्रत्यक्षपणे भाग घेतला आहे. प्रस्तुत सदनिका व भुखंडाची ऑनलाईन सोडत दि. 30 जून 2018 रोजी सकाळी 10.00 वा. आय.टी. इन्क्युबेशन सेंटर ,नांदेड सिटी , सिंहगड रोड पुणे येथे आयोजित करण्यात आली आहे. ऑनलाईन सोडत www.lottery.mhada.gov.in या संकेत स्थळावरही पहाता येणार आहे, अशी माहिती पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मडळाचे कार्यकारी अभियंता-1 यांनी दिली आहे.
पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाची 30 जून रोजी ऑनलाईन सोडत
Date:


