पुणे – कन्झ्युमर गायडन्स सोसायटी ऑफ इंडिया मुंबई तर्फे पुना मर्चंट हॉल, मार्केट यार्ड पुणे येथे ग्राहक जनजागृती विषयक शिबिर घेण्यात आले. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी दिनेश भालेदार, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल कारंडे, सहायक अन्न धान्य वितरण अधिकारी विश्वनाथ विरनक, नायब तहसिलदार उत्तम बडे, नायब तहसिलदार अंकुश कांबळे, कन्झ्युमर गायडन्स सोसायटी ऑफ इंडियाच्या सदस्य आनंदिता कवूर उपस्थित होते.
शिबीरामध्ये कन्झ्युमर गायडन्स सोसायटी ऑफ इंडियाच्या आर्थिक सल्लागार प्राची मयेकर यांनी आर्थिक गुंतवणुक करतांना होणारी फसवणूक तसेच योग्य गुंतवणूक पद्धती बाबत मार्गदर्शन केले.
विविध वस्तुंच्या जहिरातीं मधून ग्राहकांची फसवणूक होते. यावेळी कोणती दक्षता घ्यावी तसेच फसवणूक टाळण्यासाठीच्या खबरदारी विषयी सोसायटीचे संयुक्त्त सचिव दिनेश भंडारे यांनी उपस्थित ग्राहकांना माहिती दिली. शिबीराला मोठ्या संख्येने ग्राहक उपस्थित होते.

