पुणे- दिनांक 8 मार्च 2018 रोजी महिला दिन साजरा करण्यात येणार आहे. या अनुषंगाने महिलांमध्ये निवडणूक विषयक जागरूकता निर्माण व्हावी या दृष्टीने निवडणूक विषयक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या निमित्त दिनांक 3 मार्च 2018 रोजी कमिन्स अभियांत्रिकी महिला महाविद्यालय, कर्वेनगर, पुणे येथून महिलांची 4 कि.मी. ची मॅरेथॉन स्पर्धा आयोजीत करण्यात आलेली आहे. या स्पर्धेत 200 ते 300 विद्यार्थिनी व महिला सहभागी होणार आहेत. या स्पर्धेची सूरुवात कमिन्स अभियांत्रिकी महिला महाविद्यालय, कर्वेनगर येथून सकाळी 7 वाजता होणार असून सहभागींनी या ठिकाणी सकाळी 6.30 वाजता उपस्थित रहावे. मॅरेथॉन कर्वेनगर चौक-वनदेवीमंदिर- हहाणूकर कॉलनी मार्गे, कर्वे पूतळा व कर्वे रोड पासून परत त्याच मार्गे कमिन्स अभियांत्रिकी महिला महाविद्यालय, कर्वेनगर येथे सकाळी 8 वाजता येवून समाप्त होणार आहे.
तसेच दिनांक 8 मार्च 2018 रोजी अल्पबचत भवन, पुणे येथेही महिला दिनाच्या अनुषंगाने निवडणूक विषयक विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती उप जिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

