पुणे दि. 22 : प्रजासत्ताक दिनाचा 68 वा वर्धापन दिन समारंभानिमित्त दि.26 जानेवारी 2018 रोजी सकाळी 9.15 वाजता पोलीस संचलन मैदान, शिवाजीनगर, पुणे येथे राष्ट्रध्वजास मानवंदना व पोलीस, गृहरक्षक दल, नागरी संरक्षण दल, इत्यादींच्या संयुक्त संचलनाचा शासकीय समारंभ होईल.
पालकमंत्री गिरीश बापट हे या प्रसंगी मानवंदना स्विकारणार आहेत. पुणे शहरातील सर्व विभाग प्रमुख यांनी या कार्यक्रमास दि.26 जानेवारी 2018 रोजी सकाळी 9 वाजता उपस्थित राहावे. तसेच आपल्या कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांना प्रशासकीय नियंत्रणाखाली पुणे येथील सर्व दुय्यम कार्यालय प्रमुखांना, कर्मचाऱ्यांना या कार्यक्रमास उपस्थित राहण्याबाबत योग्य त्या सूचना देण्यात याव्यात. अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती लक्षात येण्यासाठी संबंधित कार्यालय प्रमुखांनी त्यांच्या कार्यालयापुरता हजेरीपट ठेवून कार्यक्रमास अनुपस्थित असलेल्या अधिकारी, कर्मचारी यांची नावे तात्काळ या कार्यालयास कळवावीत.
जास्तीत जास्त व्यक्तींना या मुख्य कार्यक्रमास भाग घेता यावा त्यासाठी त्या दिवशी सकाळी 8.45 ते 10 च्या दरम्यान ध्वजारोहणाचा इतर कोणताही शासकीय किंवा अशासकीय समारंभ करण्यात येवू नये. एखादया कार्यालयास अथवा संस्थेला आपला स्वत:चा ध्वजारोहरणाचा समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो समारंभ सकाळी 8.45 पूर्वी किंवा 10 नंतर करावा. तसेच या समारंभास उपस्थित राहणाऱ्या अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय पोशाख परिधान करावा, असे निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांनी पत्रकान्वये कळविले आहे.

