चौथ्या राज्यस्तरीय वरिष्ठ वन अधिकारी परिषदेचा समारोप
पुणे–दोन कोटी वृक्ष लागवडीचे शिवधनुष्य आपण यशस्वीपणे पेलले असून २०१९ साली आपल्याला ५०
कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य साध्य करावयाचे आहे. त्यासाठी सर्वांनी तयार रहावे तसेच येत्या काळात रस्ता तिथे झाडयोजना राबविण्याचे नियोजन करण्यात येत असून वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही योजना यशस्वी होण्यासाठी प्रयत्नकरावे अशी सूचना वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज वन विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या.यशदा येथे दोन दिवस चालणाऱ्या चौथ्या राज्यस्तरीय वरिष्ठ वन अधिकारी परिषदेच्या समारोपप्रसंगी श्री.मुनगंटीवार अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी वन सचिव विकास खरगे, प्रधान मुख्य संरक्षक(वनबल प्रमुख), सर्जन भगत सिंग, प्रधान मुख्य संरक्षक (उत्पादन व्यवस्थापन), ए.एस.के.सिन्हा, प्रधान मुख्य संरक्षक(वन्यजीव) श्री. भागवत, प्रधान मुख्य संरक्षक (संशोधन व शिक्षण) मोफऊल हुसेन उपस्थित होते.
श्री. मुनगंटीवार म्हणाले, वनविभागातील अधिकाऱ्यांच्या काटेकोर नियोजनामुळे व लोकसहभागामुळे दोनकोटी वृक्षलागवडीचा कार्यक्रम आपण यशस्वीपणे पुर्ण केला आहे. मात्र 2019 साली आपल्याला ५० कोटी वृक्षलागवडकरावयाची आहे. राज्यातील महामार्ग, राज्य मार्गावर रस्ता तिथे झाड ही महत्वाकांक्षी योजना राबविण्यात येणार आहे.
वन विभागातर्फे येणाऱ्या काळात विविध उपक्रम व योजना हाती घेण्यात येणार आहे. या सर्व उपक्रमांचे नियोजनकाळजीपूर्वक व सूत्रबध्द पध्दतीने करावे व या उपक्रमांमध्ये नागरिक, स्वयंसेवी संस्थानाही सहभागी करुन घ्यावे अशीसूचना वन मंत्री मुनगंटीवार यांनी केली. वन विभागातर्फे पर्यावरणपूरक अनेक योजना राबविण्यात येतात. अशायोजनांची माहिती जनेतपर्यत सहज पोहोचावी यासाठी शासनाचे मुखपत्र असलेल्या लोकराज्य मासिकामध्ये वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी नियमित लिखाण करण्याची सूचना यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना केली. स्मृती उद्यानउभारणे, सिनेमागृहात स्लाईड दाखविणे, वन विभागाचे संकेतस्थळ अद्ययावत करणे, जलयुक्त शिवार योजनेच्या धर्तीवरवनयुक्त शिवार योजना राबविणे, वन जमीनींचे मॅपींग करणे, आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन साजरा करणे, मराठवाडयासाठी
इकोबटालीयन तयार करणे, वन विभागाचे उत्पन्न वाढविणे, वन विभागाशी नागरिकांना संपर्क साधता यावा यासाठीटोल फ्री कॉल सेंटर उभारणे, वन व्यवस्थापनामध्ये नवीन तंत्रज्ञान अंमलात आणणे अशा विविध योजना प्रस्तावित असूनत्याची जबाबदारी लवकरच अधिकाऱ्यांवर सोपविली जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. पुणे वन विभागाच्यावतीनेयावेळी मंत्रीमहोदयांना स्मृतीचिन्ह भेट देण्यात आले.
या कार्यशाळेला राज्यभरातील वन विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.