पुणे– ठाणे येथे 20 आणि 21 जानेवारी 2018 या कालावधीत मराठी व्यंगचित्रकार संमेलन होणार आहे. यानिमित्ताने आयोजित प्रदर्शनासाठी व्यावसायिक व्यंगचित्रकार, व्यंगचित्रकारांना मराठी व्यंगचित्रे-अर्कचित्रे पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या व्यंगचित्र प्रदर्शनाला विषयाचे बंधन नसून पुढील पत्त्यावर अथवा ई-मेल पत्त्यावर खालील नियमांस अनुसरून आपली केवळ तीन मराठी व्यंगचित्रे पाठवावी, असे आवाहन व्यंगचित्रकार संमेलन समिती तर्फे करण्यात आले आहे. व्यंगचित्रे-अर्कचित्रे स्वरचितच असावी. फक्त तीन व्यंगचित्रे-अर्कचित्रे पाठवावीत. आकार ए-फोर किंवा ए थ्री आणि फॉरमॅट जेपीजीअथवा टीप्फ फाईल स्वरुपात असावी. एखादे चित्र प्रदर्शित न करण्याचा अधिकार निवड समितीने राखून ठेवलेला आहे.
ई-मेल ऐवजी मूळ व्यंगचित्रे पोस्टाने पाठविताना पाकिटावर ‘व्यंगचित्र प्रदर्शन’ असा स्पष्ट उल्लेख असावा. व्यंगचित्रे-अर्कचित्रे स्वीकारण्याची अंतिम तारीख 2 जानेवारी 2018 आहे. त्यानंतर प्राप्त झालेली व्यंगचित्रे स्वीकारली जाणार नाहीत. व्यंगचित्रे-अर्कचित्रे फक्त पोस्टाने अथवा मेलवर पाठवावी. व्हॉट्सएप्पवर पाठवलेली व्यंगचित्रे ग्राह्य धरली जाणार नाही. प्रस्थापित व्यंगचित्रकारांनाच या प्रदर्शनासाठी भाग घेता येईल. त्यासाठी कार्टूनिस्ट्स कंबाईनची सदस्य वर्गणीची अट आहे. वार्षिक वर्गणी 300 रुपये असून प्रदर्शनाच्या ठिकाणी अरविंद गाडेकर यांच्याकडे जमा करावी. व्यंगचित्रे पोस्टाने पाठवण्यासाठी पत्ता: कार्टूनिस्ट्स कंबाईन, बी-4, कल्पतरु, रश्मी कॉम्प्लेक्स, मेंटल हॉस्पीटल रोड, ठाणे (पश्चिम) 400604 (भ्रमणभाष– 9821739327) ई-मेल पत्ता: cc18thane@gmail.com अधिक माहितीसाठी महेंद्र भावसार 7021967587 किंवा रवींद्र बाळापुरे 7507329721 यांच्याशी संपर्क साधावा.


