पुणे,दि. 30: जिल्ह्यातील खनिजकर्मविषयक कामासंदर्भात तसेच योजनासंदर्भात जिल्हा खनिज प्रतिष्ठाणची बैठक शासकीय विश्रामगृह येथे अन्न व नागरी पुरवठा तथा पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली आज घेण्यात आली.
यावेळी आमदार सुरेश गोरे, बाबुराव पाचर्णे, जिल्हाधिकारी सौरभ राव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, आदी मान्यवर तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
संबंधित अधिकाऱ्यांनी जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नियोजित कामांविषयी सादरीकरणाद्वारे बापट यांना सविस्तर माहिती दिली. श्री. बापट यांनी संबंधित अधिकाऱ्यांना पुढील कामासंदर्भात सूचना तसेच मार्गदर्शन केले.

