पुणे, दि. 5: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदारांसाठी विशेष मतदार नाव नोंदणी मोहिम राबविण्यात येत आहे. त्यासाठी 210 कोथरुड विधानसभा मतदार संघातील मतदारांनी 3 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर 2017 या कालावधीत नावनोंदणी करावी, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी, 210-कोथरुड विधानसभा मतदार संघ, पुणे यांनी केले आहे. या मोहिमेंतर्गत मतदार यादीतील मयत मतदारांची नावे वगळण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. सर्व पात्र मतदारांचे अर्ज 3 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर 2017 या कालावधीत स्वीकारण्यात येणार आहेत. यासाठी पात्र मतदारांनी नमुना क्रमांक 6 चे अर्ज, तर मयतांची नावे वगळ्यासाठी नमुना क्रमांक 7 चे अर्ज आवश्यक कागदपत्रांसह सादर करावेत.
मतदारांच्या सोयीसाठी दुसऱ्या व चौथ्या रविवारी (दि. 8 ऑक्टोबर व 22 ऑक्टोबर 2017 रोजी) विधानसभा मतदारसंघाच्या सर्व मतदार केंद्रावर सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदारनोंदणीची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. 210 कोथरुड विधानसभा मतदार संघ, पुणे कर्वेरोड क्षेत्रीय रेल्वे बुकींग कार्यालया शेजारी, पुणे तसेच सर्व मतदान केंद्रे या ठिकाणी अर्ज स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून पात्र मतदारांनी छायाचित्र मतदार यादीत आपले नाव समाविष्ट करुन घ्यावे, असे आवाहन 210 कोथरुड विधानसभा मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी यांनी केले आहे.