पुणे, दि. 19: जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र पुणे व सरस्वती मंदिर संस्थेचे सरस्वती मंदिर स्किल डेव्हलपमेंट सेंटर, शुक्रवार पेठ पुणे यांच्या संयुक्त विद्यामाने शनिवार दि. 23 सप्टेंबर 2017 रोजी सरस्वती मंदिर संस्था, शुक्रवार पेठ, बाजीराव रोड, नातुबाग, पुणे-2 येथे सकाळी 10 वाजता रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
मेळाव्यासाठी पुणे शहर, हडपसर, एम.आय.डी.सी औद्योगिक परिसरातील एकूण 26 उद्योजक सहभागी होणार असून एकूण 2664 रिक्तपदे उपलब्ध आहेत. जिल्ह्यातील 10 वी/12वी/आय.टी.आय/तांत्रीक पदवीधारक, पदवीधर तसेच उच्च पदवीधर उमेदवारांनी या खाजगी क्षेत्रातील उपलब्ध असणाऱ्या जागेसाठी प्रत्यक्ष मुलाखतीस उपस्थित राहून या सुवर्णसंधिचा लाभ घ्यावा. सहभाग घेणाऱ्या सर्व उमेदवारांनी www.mahaswayam.in या संकेत स्थळावर उद्योजकांची मागणी पाहून अपली संमती नोंदवावी, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, पुणे सहायक संचालक अ.ऊ.पवार व सरस्वती मंदिर संस्थेचे चेअरमन विनायक आंबेकर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.