पुणे, – सामाजिक भान कायम राखून देशसेवा करा. आपण अनेक क्षेत्रात विकास केला आहे. पण
अद्यापही समाजातील काही घटक विकासाच्या प्रतिक्षेत आहेत. त्यांच्यापर्यंत विकासाची फळे पोहोचण्यासाठीकार्यरत रहा, असे आवाहन सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या(यूपीएससी) परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या यशस्वी विद्यार्थ्यांना केले.
यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या राज्यातील विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा बार्टीच्यावतीने आयोजित
करण्यात आला होता. यशदा येथील लेझीम हॉल येथे आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात मंत्री
राजकुमार बडोले यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार केला. त्यानंतर ते बोलत होते. यावेळी बार्टीचे
महासंचालक राजेश ढाबरे, यशदाचे प्रकल्प संचालक सचिन कळंत्रे, प्रकल्प संचालक रूपाली आवले, सतीशपाटील, प्रणाली दहिवाल आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले म्हणाले, आपल्या देशांने अनेक क्षेत्रात प्रगती केली आहे. पण अद्यापहीसमाजातील असे अनेक घटक आहेत त्यांच्यापर्यंत विकासाची गंगा अद्याप पोहोचलेली नाही. अशा घटकालाविकासाच्या कक्षेत आणण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. आपल्या देशाला अद्यापही गरीबी, बेरोजगारी, निरक्षरता,कुपोषण अशा समस्यांचा समाना करावा लागत आहे. राज्य आणि केंद्र सरकारकडून यावर ठोस प्रयत्न केले जात आहेत. पण अद्याप त्याच्या अंमलबजावणीत कोठेतरी उणिवा राहत आहेत. त्या भरून काढण्यासाठी नव्यादमाच्या अधिकाऱ्यांनी नाविन्यपूर्ण कल्पनांचा उपयोग करावा.आपल्या देशात सध्या नागरीकरणाचा वेग अतिशय आहे. त्यामुळे सध्या अनेक प्रश्ने आणि आव्हानांचा सामना शासन आणि प्रशासनाला करावे लागत आहेत. या समस्या नव्याने उपस्थित होत आहेत. त्यामुळे त्यांच्यावरील उत्तरे शोधतानाही नाविन्यपुर्ण विचार करावा लागणार आहे. हा विचार नव्या दमाच्या अधिकाऱ्यांनी करावा,असे आवाहनही मंत्री बडोले यांनी यावेळी केले. यावेळी महासंचालक ढाबरे, प्रकल्प संचालक सतीश पाटीलयांचीही भाषणे झाले. प्रणाली दहिवाल यांनी आभार मानले.
यावेळी श्रीकृष्णनाथ पांचाळ, हनुमंत झेंडगे, सिध्देश्वर बोंडार, रोहन बोत्रे, राहुल पांडवे, मुकुल
कुलकर्णी, अक्षय पाटील, संजीव चेटुले, अन्सार शेख, दत्तात्रय शिंदे, विवेक भस्मे, श्रीकांत सुसे, संदीप भोसले,अमित मुंडे, स्वप्नील पुंडेकर, आदिती वाळुंज, पूनम पाटे, धनाजी मगर, श्रद्धा पांडे, विशाल साकोरे, देवयानी हालके. प्रसाद मेणकुदळे, प्रविण डोंगरे, आकाश वानखेडे, किरण शिंदे, ऋषीकेश खिलारी, कुलदीप सोनावणे,विनोदकुमार येरणे, नितीश पाथोडे , लक्ष्मीकांत सुर्यंवंशी, ओंकारेश्वर कांचनगोरे, अजित रॉय टोगिरे आदी यशवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.