पिंपरी- श्रमिक पत्रकार तसेच छोटे दैनिक-साप्ताहिकांच्या प्रश्नांची मला जाण असून हे प्रश्न सोडविण्यासाठी कार्यालयीन स्तरावर मी माझ्या परीने प्रयत्न करीन, अशी ग्वाही जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांनी दिली.
येथील पिंपरी-चिंचवड पत्रकार संघातर्फे श्री. सरग यांचा सत्कार नुकताच पार पडला. यावेळी सत्काराला उत्तर देतांना ते बोलत होते. पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष बापूसाहेब गोरे, पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या अध्यक्षा सायली कुलकर्णी यांची उपस्थिती होती.
पिंपरी महानगरपालिकेच्या कै. भा.वि. कांबळे पत्रकार कक्षात हा सत्कार संपन्न झाला.
श्री. सरग यांना आद्य पत्रकार देवर्षी नारद व्यंगचित्रकारिता पुरस्कार जाहीर झाल्याच्या निमित्तानेही शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. अधिस्वीकृती पत्रिका मिळण्यासाठीचे नियम, शासनमान्य यादीवर येण्यासाठीचे नियम, शासनाचे मुखपत्र असलेल्या लोकराज्य या मासिकाबाबत त्यांनी माहिती दिली.
कार्यक्रमास पिंपरी पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष गणेश हुंबे, समन्वयक अनिल वडघुले, उपाध्यक्ष संजय बोरा, विश्वास शिंदे, खजिनदार दादा आढाव, सरचिटणीस अजय कुलकर्णी, अनिल भालेराव, मदन जोशी, नंदकुमार रानडे, सीताराम मोरे, नाना कांबळे , प्रकाश जमाले, दत्ता गायकवाड, डी. एस. कांबळे, संदीप तापकीर, बाबू कांबळे आदी उपस्थित होते