नोंदणी विनाशुल्क करण्यात येणार
पुणे, दि. 29 : जिल्ह्यातील कृत्रीम रेतन कार्य करणाऱ्या सहकारी दुध संस्था, शासकीय संस्था, खाजगी दुध संघ यांचेकडील सर्व कृत्रीम रेतन कार्य करणाऱ्या पदवीधर व पदवीधारक तंत्रज्ञांना पशुसंवर्धन खात्याच्या मागदर्शक सुचनेनुसार, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालय, खडकी, पुणे-3 येथे नोंदणी करणे अनिवार्य केले आहे.
केंद्र शासनाने राज्यातील पैदासक्षम गायीं व म्हशींना 100 टक्के दर्जेदार कृत्रीम रेतन सेवा पुरविणे निश्चित केले आहे. त्या करीता महाराष्ट्र राज्याची पथदर्शी राज्य म्हणुन निवड करण्यात आली आहे. कृत्रीम रेतन कार्य करणाऱ्यांनी नोंदणी करुन घेणे बंधनकारक आहे. नोंदणी न केल्यास कायद्याचे उल्लंघन असून संबंधीत व्यक्तींवर, इंडीयन पिनल कोड 1860, कलम 128 अन्वये कार्यवाही करण्यात येईल. नोंदणीसाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही.
कृत्रीम रेतनासाठी वापरण्यात येणाऱ्या रेतनाचा स्त्रोत योग्य असावे व सेंट्रल मॉनीटरींग युनीटव्दारे ‘अ’ व ‘ब’ मानांकन असलेल्या गोठीत रेतन प्रयोगशाळेत तयार झालेले असणे बंधनकारक आहे. अधिक माहितीसाठी पशुवैद्यकीय दवाखाना, पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, खडकी, पुणे-3 व पशुसंवर्धन खात्याच्या टोलफ्री क्रमांक-18002330418 वर संपर्क साधावा असे आवाहन पुणे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.


