Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

सोलापूर जिल्हा डिसेंबरपर्यंत हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Date:

सोलापूर :-    सोलापूर जिल्हा 31 डिसेंबर 2017 पर्यंत हागणदारीमुक्त्‍ करण्याचा संकल्प करा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  येथे दिल्या.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आढावा बैठक झाली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. मंद्रुप येथील औद्यागिक प्रशिक्षण संस्थेच्या सभागृहात ही बैठक झाली. यावेळी व्यासपीठावर सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजय देशमुख, जिल्हा परिषद अध्यक्ष संजयमामा शिंदे,महापौर शोभा बनशेट्टी,खासदार विजयसिंह मोहिते-पाटील,शरद बनसोडे, आमदार गणपतराव देशमुख, दिलीप सोपल,  बबनदादा शिंदे,  हणमंत डोळस, भारत भालके, प्रशांत परिचारक, ॲड.रामहरी रुपनवर, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवे्ंद्र फडणवीस म्हणाले, “सोलापूर जिल्हा स्वच्छता आणि हागणदारीमुक्त गाव करण्याच्या अभियानात आघाडीवर आहे. जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी 31 मार्च 2018 पर्यंत मुदत आहे. पण पूर्ण जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेने अतिशय चांगले नियोजन केले आहे. त्या नियोजनानुसार कामकाज करुन 31 ‍डिसेंबर 2017 पूर्वीच सोलापूर जिल्हा हागणदारीमुक्त झाला पाहिजे. ”

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,  ‘ग्रामीण भागाचा विकास व्हावा, ग्रामीण महाराष्ट्र समृध्द व्हावा यासाठी हे सारे प्रयत्न आहेत त्यासाठीच जलयुक्त शिवार, पर्यावरण पूरक ग्राम, तंटामुक्त गांव, स्वच्छ ग्राम, सांसद आणि आमदार आदर्श ग्राम या सा-या योजना अभियान, गावांच्या सर्वांगीण विकासासाठी  आहेत. मात्र त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे आणि योजनेतील कामे गुणवत्तेची होण्याची आवश्यकता आहे. ”

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, जलयुक्त शिवार अभियानामूळे ग्रामीण भागात पाणी आणि पाण्याच्या संवर्धनाबाबत अतिशय चांगले काम होत आहे. प्रत्येक गावात एक चळवळ उभी राहीली आहे. गावातील प्रत्येक नागरीक जलयुक्त शिवार अभियानाच्या कामात सहभागी झाला आहे. जलयुक्त शिवार अभियान ही एक लोकचळवळ झाली आहे. जलयुक्त शिवार अभियानातील कामे 31 जूनपूर्वी करा. जेणेकरुन पाऊस पडल्यानंतर अभियानातून झालेल्या कामात पाणी साठा होणे शक्य होईल, से मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.जलयुक्त शिवार अभियानातील कामे करताना शासकीय निधीबरोबरच लोकसहभाग आणि सीएसआर निधीचाही वापर करावा, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

मागेल त्याला शेततळे योजनेतून सर्व शेतक-यांना शेततळे मिळेल असे पाहा, त्यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेऊन काम करावे. जिल्हयातील ज्या तालुक्यात शेततळयांची मागणी कमी आहे त्याबाबत अभ्यास करा असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील कामे दर्जेदार करण्याबरोबरच वेळेत कशी करता येतील याबाबत कटाक्ष ठेवा अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी केल्या. सोलापूरहून सांगली,विजापूर,येडशी आदी गावांना जोडणा-या महामार्गांचे काम गतीने करा, त्याबाबतचे प्रकल्प अहवाल ऑक्टोंबरपुर्वी तयार करा. भूसंपादनाबाबतची कार्यवाही अगोदरच करा. जेणेकरुन पावसाळा संपल्यानंतर कामाला सुरुवात करणे शक्य होईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

यावेळी पोलीस आयुक्त एम.बी.तांबडे, महापालिका आयुक्त अविनाश ढाकणे,जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, जिल्हा उपनिबंधक नारायण आघाव आदी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

निवडणूक आयोगाच्या’ चुकांची जबाबदारी फडणवीस टाळतात कशी..?

‘निवडणूक आयोगाची निर्मिती’च् सरन्यायाधीशांना बाजूला करून भाजप’ने मनमानीपणे केली…!—...

राज ठाकरे 20 वर्षांनंतर संजय राऊतांच्या घरी

मुंबई-मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज शिवसेना (ठाकरे गट)...

दिव्यांगांच्या पद सुनिश्चितीसाठी तज्ज्ञ समितीची पुनर्रचना-तुकाराम मुंढे

• प्रक्रियेसाठी एकसमान कार्यपद्धती निश्चित मुंबई, दि. ०३ : दिव्यांग...