पुणे, दि. 12: मानसिक आणि शारिरीक तणावा पासून दूर राहण्यासाठी व आपली कार्यक्षमता वाढवीण्यासाठी व्यायाम करणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन अमृता फडणवीस यांनी आज येथे केले. पुणे महिला अर्ध मॅरेथॉन स्पर्धेच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
स्पर्धेचे उद्घाटन पोलीस आयुक्त श्रीमती रशमी शुक्ला यांनी केले. स्पर्धेत यशस्वी ठरलेल्या महिला स्पर्धकांना अमृता फडणवीस यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.
महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी “फ्री रणर्स चॅरिटेबल ट्रस्ट”, पुणे पोलीस व भारतीय सैन्य दल यांच्या सहयोगाने “पुणे महिला अर्ध मॅरेथॉन” चे आयोजन करण्यात आलेली ही मॅरेथॉन स्पर्धा 21, 10, 5 आणि 3 किलोमीटर अंतरासाठी घेण्यात आली होती. या मॅरेथॉनची सुरुवात सकाळी 6 वाजता डेक्कन येथील श्री महावीर जैन विद्यालय येथून झाली. महिलांच्या या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये जवळपास चार हजार महिलांनी सहभाग नोंदवला होता.