पुणे, दि. 12 : आर्थिक व्यवहार स्त्रीया उत्तमरित्या करु शकतात असे प्रतिपादन श्रीमती अमृता फडणवीस यांनी आज येथे केले.दुर्गा महिला सहकारी संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या उद्घाटना प्रसंगी त्या बोलत होत्या.
देशातील महिला जागतीक पातळीवर सर्व प्रकारच्या आर्थिक बाबींमध्ये सक्षम रित्या काम करुन अग्रसर आहेत.स्त्रीयांना सक्षम केल्यास देश सुध्दा सक्षम होईल असे ही त्या या वेळी म्हणाल्या.
याप्रसंगी त्यांनी आवर्जून माझी कन्या भाग्यश्री या योजनेचा उल्लेख केला व राज्यात उत्तम रित्या काम करत असलेल्या महिला बचत गटांचे कौतुक केले. तसेच राज्य सरकार महिलांसाठी राबवीत असलेल्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी महिलांना केले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, सहकार आयुक्त च्रंद्रकांत दळवी,संस्थेच्या अध्यक्षा आशा देशपांडे, माजी अध्यक्षा कुसुम दंडवते, बाळासाहेब फडणवीस, शरद भीडे, संजय मोरे व संस्थेचे कोशाध्यक्ष स्नेहा टेंबे अपस्थित होत्या.