पुणे : आंतरराष्ट्रीय महिला दिन 8 मार्च रोजी साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने प्रधान सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी यांनी महिलांना लोकशाही प्रक्रियेमध्ये समावून घेण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे सूचित केले आहे. महिलांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात महिला मतदारांची संख्या कमी आहे. महिला दिनानिमित्त ही तफावर दूर करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. यासाठी महिला वसतीगृह, अंगणवाणी सेविका, आशा वर्कर परिचारिका, महिला बचत गट, अशासकीय संस्था इत्यादिंच्या मदतीने महिला मतदारांची नोंदणी वाढविणे, राज्यातील प्रतिष्ठित महिलांच्या माध्यमातून महिलांना मतदार नोंदणीसाठी प्रोत्साहित करणे, विवाहीत महिलांची पूर्वीची नोंदणी रद्द करुन नवीन ठिकाणी त्यांची मतदार म्हणून नोंदणी करणे, महिलांची मतदार नोंदणी वाढविणे याप्रकारचे उपक्रम निवडणूक यंत्रणा व बी.एल.ओ.च्या सहकार्याने राबविण्यात येणार आहे. जिल्हयातील सर्व मतदार नोंदणी अधिकारी व सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयात बुधवार,दिनांक 8 मार्च,2017 रोजी महिला मतदार साक्षरता हा विशेष उपक्रम साजरा करण्यात येणार आहे. या कार्याक्रमामध्ये ज्या महिलांची नव्याने मतदार नोंदणी झाली आहे अशा महिलांना मतदार छायाचित्र ओळखपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यासंदर्भात् संबधित मतदार नोंदणी अधिकारी व सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. या उपक्रमांचा महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन उप जिल्हा निवडणूक अधिकारी, पुणे यांनी केले आहे.
महिला दिनानिमित्त महिलांचे मतदार यादीत नाव नोंदणीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार
About the author
SHARAD LONKAR
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/