पुणे : जिल्हा परिषद पुणे अंतर्गत येणाऱ्या तेरा पंचायत समिती सभापती पदाची आरक्षण सोडत जिल्हा परिषदेच्या सभागृहात जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या हस्ते आज काढण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीचे समन्वय अधिकारी विक्रांत चव्हाण, उप मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजीत बढे उपस्थित होते.
पंचायत समिती सभापती पदाचे सन 2017 चे आरक्षण पुढीलप्रमाणे आहे.बारामती-अनुसूचित जाती, खेड-अनुसूचित जमाती (महिला), मुळशी-नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), दौंड-नागरिकांचा मागासप्रवर्ग,आंबेगाव-नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), मावळ- नागरिकांचा मागास प्रवर्ग, वेल्हा-सर्वसाधारण महिला, भोर-सर्वसाधारण महिला, हवेली-सर्वसाधारण महिला, जुन्नर-सर्वसाधारण महिला, शिरुर- सर्वसाधारण, पुरंदर- सर्वसाधारण आणि इंदापूर- सर्वसाधारण.